शिवसेनेचे धक्कातंत्र सुरूच

By Admin | Updated: January 9, 2017 01:51 IST2017-01-09T01:51:43+5:302017-01-09T01:51:57+5:30

मनसे-राकाँला झटका : ओहोळ, शेख, गुळवे यांचा प्रवेश

Shivsena's harassment continued | शिवसेनेचे धक्कातंत्र सुरूच

शिवसेनेचे धक्कातंत्र सुरूच

 नाशिक : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे धक्कातंत्र सुरूच असून, रविवारी (दि.८) पुन्हा एकदा मनसे, राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसला झटका दिला. मनसेच्या नगरसेवक सुमन ओहोळ, अपक्ष नगरसेवक रशिदा शेख आणि जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे सदस्य संदीप गुळवे यांच्यासह कॉँग्रेस-मनसेच्या माजी नगरसेवकांनीही शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या सर्वांना शिवबंधन बांधले.
महापालिका निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारी मिळविण्याची स्पर्धा वाढणार असून, त्या पार्श्वभूमीवर पक्षांतरालाही वेग आला आहे. शिवसेनेने रविवारी मनसे, कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीला आणखी झटका दिला.
 

Web Title: Shivsena's harassment continued