शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? मोदी सरकारनं दिले मोठे संकेत!
2
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
5
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
6
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
7
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
8
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
9
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
10
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
11
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
12
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
13
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
14
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
15
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
16
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
17
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
18
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
20
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या जागांवर शिवसेनेचा दावा

By admin | Updated: July 25, 2014 00:27 IST

आढावा बैठक : घोलप पुन्हा रिंगणात उतरण्याच्या तयारीत

नाशिक : लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाने नाशिक शहरात चारही जागांवर दावा सांगितला असला, तरी शिवसेनेनेच त्यापुढे इच्छुकांची चाचपणी केली आहे. जिल्ह्यातील जागांपेक्षा नाशिक शहरातील पूर्व आणि पश्चिम या दोन्ही मतदारसंघांवर प्रबळ दावेदारी सांगितली आहे. दरम्यान, आमदारकी गेलेले बबनराव घोलप पुन्हा एकदा घोड्यावर बसण्याच्या तयारीत आहेत.
शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी नाशिक विभागातील शिवसेना पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आगामी विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला. संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर, तसेच स्थानिक जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांच्या उपस्थितीत शहरातील चारही विधानसभा जागांचा आढावा घेण्यात आला. नाशिक पश्चिम मतदारसंघ भाजपाला देण्यात आला होता. परंतु या मतदारसंघात भाजपाचा पराभव झाला. या मतदारसंघात नगरसेवक विलास शिंदे, सुधाकर बडगुजर आणि डी. जी. सूर्यवंशी इच्छुक आहेत. नाशिक पूर्वमधून इच्छुक म्हणून निवृत्ती मते, शिवाजी निमसे यांनी दावेदारी सांगितली.
तथापि, इच्छुकांनी एकमत करून उमेदवार निश्चित करावा, अन्यथा एकाला उमेदवारी देण्यासाठी पक्षातील लोकही नाराज व्हायला नको, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. देवळाली विधासभा मतदारसंघातून बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात दोषी ठरलेले बबनराव घोलप पुन्हा एकदा उमेदवारीसाठी तयार झाले आहेत. तांत्रिक अडचणी न आल्यास आपण विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे सांगितले. अन्यथा योगेश घोलप यांचे नाव त्यांनी पुढे केले.
याचवेळी माजी नगरसेवक प्रताप मेहेरोलिया यांनीदेखील इच्छुक असल्याचे सांगितले. नाशिक मध्य मतदारसंघातून माजी महापौर विनायक पांडे, महानगरप्रमुख अजय बोरस्ते आणि नगरसेवक सचिन मराठे यांनी दावेदारी केली असून, त्यावर ठाकरे यांनी कटूता टाळण्यासाठी सर्व इच्छुकांनी एकत्रित उमेदवारीचा निर्णय द्या, अन्यथा मी ठरवेल त्या उमेदवाराला निवडून द्यावे लागेल, असे सांगितल्याचे वृत्त आहे. बैठकीला शिवसेनेचे नाशिक विभागातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)