शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक कारखान्याचे गाºहाणे शरद पवार यांंच्या कानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 23:40 IST

आर्थिक परिस्थितीने जर्जर झालेला नाशिक सहकारी साखर कारखाना पूर्ववत सुरू करण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी मंगळवारी सकाळी राष्टÑवादीचे नेते खासदार शरद पवार यांची भेट घेतली. कारखाना बंद पडल्यामुळे सभासद शेतकऱ्यांची कुचंबना झाली असून, शेकडो कामगारांवर उपासमारीची वेळ आली असल्याची बाब पवार यांना पटल्यामुळे लवकरच कारखाना सुरू करण्यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्री, वित्तमंत्री व सहकारमंत्र्यांची संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन पवार यांनी दिले.

नाशिक : आर्थिक परिस्थितीने जर्जर झालेला नाशिक सहकारी साखर कारखाना पूर्ववत सुरू करण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी मंगळवारी सकाळी राष्टÑवादीचे नेते खासदार शरद पवार यांची भेट घेतली. कारखाना बंद पडल्यामुळे सभासद शेतकऱ्यांची कुचंबना झाली असून, शेकडो कामगारांवर उपासमारीची वेळ आली असल्याची बाब पवार यांना पटल्यामुळे लवकरच कारखाना सुरू करण्यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्री, वित्तमंत्री व सहकारमंत्र्यांची संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन पवार यांनी दिले.राज्यातील अनेक कारखान्यांबरोबरच नाशिक जिल्ह्यातील निफाड, नाशिक साखर कारखाना गेल्या काही वर्षांपासून बंद पडला आहे. नाशिक साखर कारखाना गेल्या सात वर्षांपासून बंदस्थितीत असून, या कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन बाराशे मेट्रिक टन आहे. एकेकाळी भरभराट असलेल्या या कारखान्याचे नाशिक, सिन्नर, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर या चार तालुक्यांत सतरा हजार सभासद आहेत.कारखान्याने जिल्हा बॅँकेकडून कोट्यवधींचे कर्ज घेतले असून, कारखाना बंद पडल्यामुळे बॅँकेच्या कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. त्यामुळे बॅँकेने कारखान्यावर जप्ती आणली असून, शेकडो कामगारही बेकार झाले आहेत ही सर्व माहिती शरद पवार यांना देण्यात आली.कारखाना पुन्हा सुरू झाल्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल त्याचबरोबर जिल्हा बॅँकेचे कर्जफेड होऊन बॅँकेचीही आर्थिक परिस्थिती दुरुस्त होऊ शकेल. राज्य सरकारने कारखाना सुरू करण्यासाठी कर्जाची हमी घ्यावी, कारखाना सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही यावेळी शरद पवार यांच्याकडे करण्यात आली. नाशिक कारखाना सुरू करण्याबाबत लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सहकारमंत्री व वित्तमंत्र्यांची संयुक्तबैठक घेण्याची ग्वाही पवार यांनी यावेळी हेमंत गोडसे, तानाजी गायधनी, दिनकर पाटील यांना दिली.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेNashikनाशिकSharad Pawarशरद पवारChief Ministerमुख्यमंत्री