शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
2
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
3
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
4
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
5
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
6
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
7
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
8
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
9
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
10
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
11
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
12
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
13
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
14
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
15
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
16
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
17
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
18
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
19
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
20
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
Daily Top 2Weekly Top 5

सेवा हमी कायदा नागरिकांचा अधिकारच : स्वाधीन क्षत्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 19:37 IST

शासकीय विविध विभागांच्या कामात पारदर्शकता आणण्यासाठी हा कायदा अतिशय महत्त्वपूर्ण असून, लोकप्रतिनिधींनाही या कायद्याची माहिती देणे आवश्यक आहे. सन २०१५ पासून हा कायदा अस्तित्वात

ठळक मुद्देमोबाइलवर आरटीएस महाराष्ट्र नावाचे अ‍ॅप तयार करण्यात आले प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सेवा हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार असून, राज्य शासनाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ या कायद्याद्वारे राज्यातील नागरिकांना त्यांची कामे शासकीय यंत्रणेद्वारे विशिष्ट वेळेत पूर्ण होण्याकरिता अधिकार बहाल केला आहे. हा कायदा तळागाळातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचवून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आवाहन राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी केले.

आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात आढावा बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते. क्षत्रिय पुढे म्हणाले की, शासकीय विविध विभागांच्या कामात पारदर्शकता आणण्यासाठी हा कायदा अतिशय महत्त्वपूर्ण असून, लोकप्रतिनिधींनाही या कायद्याची माहिती देणे आवश्यक आहे. सन २०१५ पासून हा कायदा अस्तित्वात आला असून, कायद्याच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना त्यांची कामे शासनाकडून करून घेण्याचा अधिकारच प्राप्त झाला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी मोबाइलवर आरटीएस महाराष्ट्र नावाचे अ‍ॅप तयार करण्यात आले असून, प्रत्येक नागरिकाने या अ‍ॅपव्दारे सेवेचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.यावेळी बोलताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्हा परिषद अंतर्गत सर्व विभागांच्या सेवांचा डॅशबोर्ड उपलब्ध करून देण्याची विनंती केली. जिल्हा परिषदेच्या वतीने या कायद्याच्या जनजागृतीसाठी लवकरच विविध कार्यशाळा, प्रशिक्षण यांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त प्रतिभा संगमनेरे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक उज्ज्वला बावके, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे, तहसीलदार प्रशांत पाटील यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद