शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
4
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
5
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
6
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
7
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
8
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
9
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
10
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
11
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
12
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
13
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
14
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
15
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
16
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
17
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
18
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
19
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
20
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा

किशोरवयीन मुला-मुलींशी संवाद होणे गरजेचे परिसंवाद : ‘पेडियाट्रीशन अ‍ॅक्शन फॉर टीनेज हेल्थ’ परिसंवादात सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 1:07 AM

किशोरवयीन मुला-मुलींसाठी त्यांच्या वयाचा काळ हा त्यांच्या जडणघडणीतील महत्त्वाचा टप्पा असतो. या काळात पालक, शिक्षक आणि वैद्यकीय तज्ज्ञांची भूमिका अत्यंत मोलाची ठरणारी असते

ठळक मुद्देदोनदिवसीय प्रदर्शन व चर्चासत्राचे उद्घाटन संस्कार मुलांमध्ये रूजला पाहिजेविविध पोस्टर्सच्या माध्यमातून माहिती

नाशिक : किशोरवयीन मुला-मुलींसाठी त्यांच्या वयाचा काळ हा त्यांच्या जडणघडणीतील महत्त्वाचा टप्पा असतो. या काळात पालक, शिक्षक आणि वैद्यकीय तज्ज्ञांची भूमिका अत्यंत मोलाची ठरणारी असते. त्यामुळे त्यांच्याशी सुसंवादाचा सुवर्णमध्य शोधला पाहिजे, असा सूर परिसंवादात उमटला.कूर्तकोटी सभागृहात आयोजित ‘पेडियाट्रीशन अ‍ॅक्शन फॉर टीनेज हेल्थ’ या कार्यक्रमांतर्गत दोनदिवसीय प्रदर्शन व चर्चासत्राचे उद्घाटन आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर आणि पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते झाले. सिंगल म्हणाले, रस्ते सुरक्षा ही आपली जबाबदारी सर्वच गोष्टी प्रशासन करेल, अशी अपेक्षा बाळगण्याचे कारण नाही. प्रत्येकाने एक नागरिक म्हणून आपले सामाजिक कर्तव्य पार पाडले पाहिजे. हे कर्तव्य पूर्ण करण्याचा संस्कार मुलांमध्ये रूजला पाहिजे, असेही सिंगल म्हणाले.कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी किशोरवयीन मुला-मुलींना मार्गदर्शन करण्याकरिता वैद्यकीय शिक्षणातच एक नवा अभ्यासक्र म यावा असे सांगून त्यासाठी आपण तज्ज्ञांशी चर्चा करून याबाबत पुढाकार घेऊ, असे सांगितले. इंडियन अकॅडमी आॅफ पेडीयाट्रीक्सच्या नाशिक शाखेद्वारा अ‍ॅडोसलन्ट्स हेल्थ अकॅडमीच्या सहाय्याने किशोरवयीन मुला-मुलींकरिता आयोजित कार्यक्र मातील परिसंवादात तज्ज्ञांनी मुलांना आणि पालकांना मार्गदर्शन केले. त्यांच्याशी संवादही साधला. इंडियन अकॅडमी आॅफ पेडीयाट्रीक्सद्वारा प्रशिक्षित विविध शाळांमधील विद्यार्थी अन्य विद्यार्थ्यांना किशोरवयीन समस्या जसे माध्यमांबाबत जागरूकता, अभ्यास कौशल्य, रस्ते सुरक्षा, स्वसंरक्षण, मानसिक व शारीरिक आरोग्य, ड्रग्ज व व्यसनांचे दुष्परिणाम आदी विषयांवर तज्ज्ञांच्या व विविध पोस्टर्सच्या माध्यमातून माहिती देत आहेत. अ‍ॅड. अजित छल्लानी, सोफिया कपाडिया व आस्था कटारिया यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. प्रदर्शन व चर्चासत्रास नाशिकमधील अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली असून, अशा प्रकारचा महाराष्ट्रातील हा पहिलाच उपक्र म असल्याचे नाशिक शाखेच्या अध्यक्ष डॉ. संगीता बाफना (लोढा) यांनी प्रसंगी सांगितले. सदर प्रदर्शन आजही दि. १७ रोजीही सुरू राहणार असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.