६२ हजारांचा मुद्देमाल चौघांकडून जप्त

By Admin | Updated: January 9, 2017 01:40 IST2017-01-09T01:39:53+5:302017-01-09T01:40:07+5:30

गुन्ह्याची कबुली : पोलिसांनी रचला सापळा

The seizure of 62 thousand people seized by the four | ६२ हजारांचा मुद्देमाल चौघांकडून जप्त

६२ हजारांचा मुद्देमाल चौघांकडून जप्त

नाशिकरोड : येथील पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सापळा रचून पकडलेल्या चौघाजणांनी चोरी व लुटीच्या गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून ६२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीचा मुख्य म्होरक्या फरार आहे.
जेलरोड जुना सायखेडारोड येथील धारा सोसायटीत राहणाऱ्या वत्सला आहिरे या बाहेरगावी गेल्या असताना चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडून गॅस सिलिंडर, पितळ्याचे भांडे असा सुमारे १२ हजारांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास सुरू असतांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक भीमराव गायकवाड, हवालदार उत्तम दळवी, प्रकाश भालेराव, गणेश गोसावी, प्रकाश आरोटे, सचिन वाटाणे यांनी पंचक शिवारात सापळा रचला. संशयित अनिकेत सिद्धार्थ धनले, अजय रामचंद्र पाटील (दोघे रा. जेलरोड), लखन हनुमान लोखंडे (रा. नांदुर नाका), रोहित मोहन जाधव (रा. दसक) या चौघांना सापळा रचलेल्या पोलिसांनी पकडले. चौघाजणांना पोलिसांनी खाक्या दाखविताच त्यांनी वत्सला आहिरे यांच्या घरात घरफोडी केल्याची कबुली देण्याबरोबर त्यांनी मंदिरातील दानपेटी फोडल्याची कबुली दिली. (प्रतिनिधी)

Web Title: The seizure of 62 thousand people seized by the four