शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

सीमलेस पाइप उत्पादक संकटात

By admin | Updated: June 26, 2015 01:32 IST

सीमलेस पाइप उत्पादक संकटात

  सातपूर : चीनमधील सीमलेस पाइप उत्पादक कंपन्यांनी भारतीय बाजारपेठ काबीज केल्यामुळे भारतातील पाइप उद्योग अडचणीत आले असून, त्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. या प्रकाराला वेळेत आवर घातला नाही तर आगामी काळात उत्पादकांच्या अडचणी वाढणार आहेत. मेक इन इंडिया संकल्पना अंमलात आणावयाची असेल तर भारत सरकारने अ‍ॅन्टी डम्पिंग पॉलिसीचा लवकरात लवकर स्वीकार करणे आवश्यक आहे, असे आवाहन सीमेलस ट्युब मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष दिनेश सिन्हा यांनी सातपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले. आॅईल आणि गॅस उद्योगाला पुरवठा करण्यासाठी विशिष्ट तंत्रज्ञानाचा वापर करून ट्यूब आणि सीमेलस पाइप बनविले जातात. भारतासह विदेशात या मालाचा पुरवठा केला जातो. गेल्या दोन-तीन वर्षांपासून सीमलेस पाइप उत्पादक उद्योग अडचणीत आलेले आहेत. कारण चीनमधील कंपन्यांनी भारतीय बाजार पेठ काबीज केली आहे. अन्य देशांनी चिनी उत्पादकांवर निर्बंध आणलेले आहेत. अन्य देशांप्रमाणेच भारत सरकारनेदेखील चीनच्या मालावर निर्बंध घालावेत. अन्यथा अशीच परिस्थिती राहिली, तर पुढील काही महिन्यांत आर्थिक परिस्थिती खालावण्याची शक्यता आहे. सीमलेस पाइप उत्पादक उद्योगांचे मुख्य ग्राहक सरकारी कारखाने ओएनजीसी, आॅईल इंडिया, आयओसीएल, एचपीसीएल, बीपीसीएल, ईआयएल, भेल आहेत. जर सरकारी उद्योगच चीनचे उत्पादन वापरत असतील भारतीय उद्योग संकटात येणारच आहेत. देशांनी चीनच्या उत्पादनावर निर्बंध घातल्यामुळे चीनची मुख्य बाजारपेठ भारतच आहे. स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन दिला तरच रोजगार उपलब्ध होतील, अशीही माहिती सिन्हा यांनी पत्रकार परिषदेत दिली.