मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचे शास्त्रोक्त सर्वेक्षण

By Admin | Updated: March 10, 2015 22:51 IST2015-03-10T22:50:24+5:302015-03-10T22:51:07+5:30

मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचे शास्त्रोक्त सर्वेक्षण

Scientific survey of Manmad-Indore Railway Road | मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचे शास्त्रोक्त सर्वेक्षण

मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचे शास्त्रोक्त सर्वेक्षण

मालेगाव : येत्या तीन वर्षांत मनमाड- इंदूर रेल्वेमार्गाचे शास्त्रोक्त पद्धतीने सर्वेक्षण करण्यात येईल, असे आश्वासन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांना दिले.
खासदार डॉ. भामरे यांनी रेल्वेमंत्री प्रभू यांची नवी दिल्ली येथे रेल्वे मंत्रालयात भेट घेतली. त्यावेळी खासदार डॉ. भामरे यांनी रेल्वेमंत्री प्रभू यांना मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाची आवश्यकता सांगितली. त्यानंतर प्रभू यांनी सध्या रेल्वेची आर्थिक घडी व्यवस्थित बसविणे, रेल्वेची साधनसामग्री बळकट करणे, याआधी सुरू करण्यात आलेले प्रकल्प पूर्ण करणे प्राधान्याचे असल्याचे सांगितले. मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग निश्चितच सुरू करण्यात येईल; मात्र त्यासाठी या मार्गाचे शास्त्रोक्त पद्धतीने सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे आश्वासन खासदार डॉ. भामरे यांना दिले.

Web Title: Scientific survey of Manmad-Indore Railway Road