नीलेश सूर्यवंशी ठरला सवाई अभिनेता

By Admin | Updated: January 31, 2016 00:04 IST2016-01-31T00:04:13+5:302016-01-31T00:04:53+5:30

नीलेश सूर्यवंशी ठरला सवाई अभिनेता

Sawai Actor Nilesh Suryavanshi | नीलेश सूर्यवंशी ठरला सवाई अभिनेता

नीलेश सूर्यवंशी ठरला सवाई अभिनेता

नाशिक : मुंबईच्या चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सवाई एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत येथील दी जीनिअस निर्मित ‘कस्टमर केअर’ एकांकिकेतील शंकऱ्याच्या भूमिकेसाठी नीलेश सूर्यवंशी यांना यंदाचा ‘सर्वोत्कृष्ट सवाई अभिनेता’ म्हणून गौरविण्यात आले.
‘जीनिअस’चे प्रमुख प्रवीण काळोखे यांनी ही माहिती दिली. स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहा एकांकिका मुंबईच्या, तर एक नाशिकची अशी अनोखी चुरस अनुभवायला मिळाली. ‘सवाई’च्या अंतिम फेरीत नाशिकमधून धडक मारणारी ‘कस्टमर केअर’ ही पहिलीच एकांकिका ठरली. तसेच अंतिम फेरीत सवाई अभिनेत्याचा पुरस्कार मिळविणारे नीलेश सूर्यवंशी हे पहिले नाशिककर अभिनेते ठरले. गेली काही वर्षे रंगभूमीवर गाजत असलेल्या दत्ता पाटील लिखित व बाळकृष्ण तिडके दिग्दर्शित ‘कस्टमर केअर’ला आजवर अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आता प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ‘सवाई’मुळे या एकांकिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अभिनेते वैभव मांगले आणि प्रसाद ओक यांनी काम पाहिले. एकांकिकेत करिश्मा देसले व नीलेश सूर्यवंशी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. प्रकाशयोजना रवि रहाणे व विजय रावळ, संगीत प्रतीक नाईक, नेपथ्य चंद्रकांत जाडकर व गुलाब पवार, रंगभूषा माणिक कानडे, वेशभूषा ओवी भालेराव यांची होती.

Web Title: Sawai Actor Nilesh Suryavanshi