शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

अडीच महिन्यांनी मिळाले नगरसूलला सरपंच

By admin | Updated: September 30, 2014 22:42 IST

अडीच महिन्यांनी मिळाले नगरसूलला सरपंच

नगरसूल : येथील ग्रामपंचायतीला तब्बल अडीच महिन्यांनंतर अखेर सरपंच लाभले असून, आज झालेल्या सरपंचपद निवडणुकीत अशोक विजय पाटील यांची बिनविरोध निवड झाली.नगरसूल येथील ग्रामपंचायत सरपंच सुभाष निकम यांच्यावर विविध कारणे दाखवा करत १२ ग्रामपंचायत सदस्यांनी ५ जुलै रोजी अविश्वास प्रस्ताव पारीत केला होता. मात्र निकम यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे अविश्वास निकालाविरोधात अपिल दाखल केल्याने सरपंचपद निवड लांबणीवर पडली होती. तालुक्यातील सर्वांत मोठी १७ सदस्यीय ग्रामपंचायतीस सरपंचपद रिक्त राहिल्याने अनेक विकासकामे व प्रशासकीय कामकाज ठप्प झाले होते. अखेर अडीच महिन्यांनंतर सरपंच पदासाठी निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा होताच, सोमवारी (दि.२९) ग्रामपंचायत कार्यालयात सरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली. यात वॉर्ड क्र.१ मधून निवडून आलेले सत्ताधारी गटाचे अशोक विजय पाटील यांची बिनविरोध निवड झाली.ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या निवडणूक सभेस ज्येष्ठ सदस्य प्रा. प्रमोद पाटील, उपसरपंच अनिता पैठणकर, सदस्य गोविंद माळी, वसंत माळी, मीना पाटील, वंदना कोतकर, अर्चना गायकवाड, सुरेखा पवार, अशोक वानखेडे, नितीन जाधव, सुनील पैठणकर, उज्ज्वला पैठणकर, भाऊसाहेब धनवटे, विठ्ठल बोरसे आदि उपस्थित होते.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सर्कल ए. आर. पगारे होते, तर तलाठी एम. एम. पिंपळसे, ग्रामविकास अधिकारी एम. डी. भाबड यांनी कामकाज पाहिले. निवडीनंतर नूतन सरपंच अशोक पाटील यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर कार्यालयाबाहेर उपस्थितांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. यावेळी राजेंद्र पैठणकर, बळवंत थोरात, किरण तांगडे, धर्मा बोडखे, बाजीराव कोतकर, सीताराम पैठणकर, बळवंत थोरात, राजेंद्र पगारे, गंगाधर मोकळ, बाळूमामा भालेराव, एकनाथ पठारे, पप्पू गंडाळ, बाळू जाधव, सूरज राजपूत आदिंसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.दरम्यान, यावेळी माजी सरपंच व विद्यमान सदस्य सुभाष निकम, हर्षल बहादुरे हे दोन सदस्य अनुपस्थित राहिले. (वार्ताहर)