शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यापालांचा पुन्हा ब्रेक?
2
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
3
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
4
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
5
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
6
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
7
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
8
बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!
9
वयाची ७४ वर्षे, ७२ देशांची सफर; ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा एकटीनं जगप्रवास!
10
भूसंपादन घोटाळा : अविनाश पाठकसोबतचे आणखी ३ बडे मासे रडारवर! १५ मेपर्यंत पोलिस कोठडीत मुक्काम
11
वर्षभरात १,०९८ कोटींवर चोरट्यांचा डल्ला; राज्यासाठी ‘एनसीआरबी’चा २०२४ चा धक्कादायक अहवाल
12
रेल्वेचा ‘मेगा’ गोंधळ ! सूचना नाही की घोषणा; सलग दुसऱ्या दिवशी कसारा मार्गाचा खोळंबा; प्रवाशांचा आक्रोश
13
..तर विद्रोहाची गाणी नक्कीच रस्त्यावर येतील!
14
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
15
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
16
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
17
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
18
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
19
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
20
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
Daily Top 2Weekly Top 5

शांतिगिरी महाराज यांना समाजरत्न पुरस्कार

By admin | Updated: January 20, 2017 22:55 IST

शांतिगिरी महाराज यांना समाजरत्न पुरस्कार

ओझर : जनार्दनस्वामी मौनगिरीजी महाराज धर्मपीठाचे पीठाधिश्वर अध्यात्म शिरोमणी श्री श्री १००८ महामंडलेश्वर शांतिगिरीजी महाराज यांना कल्याण येथे बाळशास्त्री जांभेकर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय ‘समाजरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.  बाळशास्त्री जांभेकर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या वतीने प्रतिवर्षी विविध क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या सन्मानीय व्यक्तींना ‘समाजरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात येतो. शैक्षणिक क्षेत्रात भरीव कार्य केल्याबद्दल शांतिगिरीजी महाराज यांना बाळशास्त्री जांभेकर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या वतीने ‘समाजरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी शांतिगिरीजी महाराजांनी आपल्याला मिळालेला ‘समाजरत्न’ पुरस्कार लगेचच जय बाबाजी भक्त परिवारास समर्पित करीत असल्याचे जाहीर केले. यावेळी बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार हिताचे विविध ठराव मांडण्यात आले.  पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात यावा, पत्रकारांना मासिक वेतन कायदा लागू व्हावा, ज्येष्ठ पत्रकारांसाठी पेन्शन योजना, पत्रकार भवनासाठी राखीव भूखंड द्यावा तशी तरतूद शासनाने करावी यासंदर्भात वक्त्यांनी भाषणे केली. (वार्ताहर)