शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

सायखेडा, चांदोरी पूरस्थिती ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 00:03 IST

सायखेडा/निफाड : धरण क्षेत्रात सुरु असलेला संततधारेमुळे दारणा आणि गोदावरी नदीच्या पाण्यात वाढ झाल्याने सायखेडा आणि चांदोरीसह नदीकाठच्या भागात पाणी घुसले बाजारतळ जलमय झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसायखेडा/निफाड : धरण क्षेत्रात सुरु असलेला संततधारेमुळे दारणा आणि गोदावरी नदीच्या पाण्यात वाढ झाल्याने सायखेडा आणि चांदोरीसह नदीकाठच्या भागात पाणी घुसले असून, शेती, वीटभट्टी यासह बाजारतळ जलमय झाला आहे. तीन दिवसांपासून स्थिती ‘जैसे थे’ आहे.  नांदूरमध्यमेशवर धरणाचे आठही गेट खुले केल्याने ६१हजार १३८ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु असला तरी सायखेडा आणि चांदोरी गावातील नदी लगतच्या वस्तीत पाणी शिरले आहे. सायखेडयातील बाजारतळात पाणी गेल्याने या भागातील ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. धरण क्षेत्रात आणि गोदाकाठ भागात सतंतधार सुरु असल्याने पाणी वाढण्याची शक्यता आहे . त्यामुळे या भागात नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सायखेडा पुलाला खालुन पाणी लागले तर बहुतेक विटभट्टी, शेती क्षेत्रात पाणी घुसले होते. ग्रामपालिकेच्यावतीने नागरिकांना नोटीसा बजविण्यात आल्या आहेत. गोदाकाठ भागात सतत तीन दिवसांपासून पाऊस सुरु असल्याने जनजीवन विस्कळीत झाली आहे. नागरीकांनी घराबाहेर न पडता घरात थांबनेच पसंत केले आहे. सततच्या पावसामुळे नागरीक दुकानात जात नसल्याने व्यावसायावर परिणाम झाला आहे. आर्थिक गणति कोलंडण्याची शक्यता आहे . पावसामुळे केवळ रेनकोट, छत्री यांच्या दुकानात थोड्याफार प्रमाणात गर्दी पहायला मिळत आहे. त्यामुळे केवळ वाढत्या मागणीमुळे केवळ हेच दुकाने सद्या तेजीत आहे. सततच्या पावसाने शेतात पाणी साचल्याने शेतीची कामे ठप्प झाली आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाऊस पडत असल्याने शेतात असलेला चारा कापता येत नाही. त्यामुळे चार दिवसापासून चाऱ्याचा प्रश्न शेतकऱ्यांणसाठी अवघड झाला आहे. एकंदरीत अशी परिस्थिती आणखी काही दिवस राहिल्यास जनजीवणावर परिणाम होण्याची शक्यता आहे.चांदोरी गावात पाणीचांदोरी येथील नदीपात्रालगत असलेले खंडेराव मंदिर पाण्याखाली गेले आहे. यापेक्षा जास्त प्रमाणात पाणी सोडल्यास किंवा परिसरात पाऊस वाढल्यास चांदोरी गावात पाणी शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून काही कुटुंबांना हलविले आहे.