शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

संजीवनीची ‘सुवर्ण’ धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 03:58 IST

चीन येथील स्पर्धेत ब्रांझ पदकावर समाधान मानाव्या लागलेल्या नाशिकच्या संजीवनी जाधव हिने

नाशिक : चीन येथील स्पर्धेत ब्रांझ पदकावर समाधान मानाव्या लागलेल्या नाशिकच्या संजीवनी जाधव हिने अखेर भूतान येथील साऊथ एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. या पदकामुळे संजीवनीने आणखी एक आंतरराष्ट्रीय पदक पटकाविले. नेपाळ आणि श्रीलंका या संघांना अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.राष्ट्रकुलची पात्रता मिळू न शकल्याने निराश न होता संजीवनीने आंतरराष्टÑीय स्पर्धांमध्ये पदकांची कमाई सुरूच ठेवली आहे. चीन येथील आशियाई क्रॉसकंट्री स्पर्धेत ब्रांझ पदक मिळविलेल्या संजीवनीने दक्षिण आशियाईमध्ये सुवर्ण पदक पटकावत आगामी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी आपण सज्ज असल्याचा सूचक इशारा दिला आहे.दक्षिण आशियाईमध्ये ८ किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत संजीवनीला शारीरिक क्षमता आणि प्रबळ मनोबल दाखविण्याची संधी असल्याने तिने सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले. या कामगिरीमुळे संजीवनीला आणखी एक आंतरराष्टÑीय पदक मिळाले असून, या हंगामात तिने आतापर्यंत सहा विविध पदके मिळविली आहेत.राष्ट्रकुल स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न अवघ्या काही अंतरामुळे हुकल्याने नाशिककरांना हळहळ वाटली होती. तिनेही हा अनपेक्षित पराभव असल्याचे सांगत आगामी स्पर्धांमध्ये जिद्दीने खेळण्याचे आश्वासन तिच्या चाहत्यांना दिले होते. त्यानुसार भूतान स्पर्धेत तिने थेट सुवर्ण जिंकत अ‍ॅथलेटिक्स आणि क्रॉसकंट्री स्पर्धेत भारताचे नाव उंचावले आहे.