सोमपूर ग्रामपंचायत मार्फत सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 14:44 IST2019-12-22T14:44:06+5:302019-12-22T14:44:30+5:30

ताहाराबाद : सोमपूर ग्रामपंचायतीच्या वतीने नेहरू विद्यालयात सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन बसविण्यात आल.

Sanitary Pad Vending Machine through Sompur Gram Panchayat | सोमपूर ग्रामपंचायत मार्फत सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन

सोमपूर ग्रामपंचायत मार्फत सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन

ठळक मुद्देअजून २ युनिट ग्रामपंचायत मार्फत बसविण्यात येणार

ताहाराबाद : सोमपूर ग्रामपंचायतीच्या वतीने नेहरू विद्यालयात सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन बसविण्यात आल.
कार्यक्र माच्या सुरु वातीला मुख्याध्यापक आर. डी. खैरनार यांनी स्वागत आणि सत्कार केला.
वेंडिंग मशीनचे उदघाटन ग्रामपंचायत सदस्य श्रीमती सविता नहिरे आणि अनिता मोरे यांनी केले. त्यानंतर सर्व विद्यार्थीनींना वैयक्तिक आरोग्याचे महत्व समजावून सांगण्यात आले. सरपंच प्रवीण भामरे यांनी या प्रकारचे अजून २ युनिट ग्रामपंचायत मार्फत बसविण्यात येणार असल्याचे सांगितले.
कार्यक्र माला बचत गट अध्यक्ष रत्ना भामरे, मिना भामरे, शीतल अहिरे, कल्पना मोरे आदी सदस्यां उपस्थित होत्या. कार्यक्र माचे फलकलेखन डी. व्ही. जाधव यांनी तर सूत्रसंचालन एस. बी. राजपूत यांनी केले. यावेळी सर्व विद्यार्थिनी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.
(फोटो २२ ताहाराबाद)

Web Title: Sanitary Pad Vending Machine through Sompur Gram Panchayat