रोटरी व्हीजन नेक्स्टचा पदग्रहण सोहळा

By Admin | Updated: July 23, 2014 00:25 IST2014-07-22T23:42:28+5:302014-07-23T00:25:52+5:30

रोटरी व्हीजन नेक्स्टचा पदग्रहण सोहळा

The Rotation of the Rotary Vision Next | रोटरी व्हीजन नेक्स्टचा पदग्रहण सोहळा

रोटरी व्हीजन नेक्स्टचा पदग्रहण सोहळा

नाशिकरोड : रोटरी नाशिक व्हीजन नेक्स्टने वर्षभरापूर्वी स्थापन केलेल्या कपल रोटरीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला.
हॉटेल क्वालिटी इन येथे पार पडलेल्या शपथग्रहण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर दादासाहेब देशमुख, माजी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर मधु रुग्वाणीजी, गव्हर्नर स्पेशल रिप्रेझेंटेटिव्ह तिमीर भौमिक, असिस्टंट गव्हर्नर फिरदोस कपाडिया आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी रोटरी नाशिक व्हीजन नेक्स्टचे अध्यक्ष मधुकर जगताप यांनी नूतन अध्यक्ष दिनेश शहा व मावळते सचिव योगेश थत्ते यांनी नूतन सचिव रेणुका जोशी यांच्याकडे पदभार सोपविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा राठी व डॉ. पमिता सुराणा यांनी केले. आभार संध्या भट्टड यांनी मानले. यावेळी डॉ. जितेंद्र सुराणा, कौसर आझाद, सोमनाथ भट्टड, मुकेश रामनानी, नंदकिशोर राठी, संतोष जैन, विनायक बेडीस, मयुरेश जोशी, पंकज आलठक्कर, ऋषिकेश म्हाळकर, माधुरी भावे, शिवकुमार शर्मा, डॉ. रमेश घाडगे उपस्थित होते.

Web Title: The Rotation of the Rotary Vision Next