रोटरी हेल्थ सोसायटीतर्फे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:15 IST2021-01-23T04:15:02+5:302021-01-23T04:15:02+5:30

नाशिक : गेल्या वर्षभरापासून सर्वच ज्येष्ठ नागरिक संघामध्ये कार्यक्रम बंद आहेत. ज्येष्ठांना आपला वेळ घालविणे कठीण झाले आहे. ...

By the Rotary Health Society | रोटरी हेल्थ सोसायटीतर्फे

रोटरी हेल्थ सोसायटीतर्फे

नाशिक : गेल्या वर्षभरापासून सर्वच ज्येष्ठ नागरिक संघामध्ये कार्यक्रम बंद आहेत. ज्येष्ठांना आपला वेळ घालविणे कठीण झाले आहे. आता परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. रोटरी हेल्थ सोसायटीच्या वतीने शनिवारी (दि. २३) दुपारी ४ वाजता रोटरी हॉल, गंजमाळ, नाशिक येथे शहरातील ज्येष्ठ नागरिक संघ व हास्य क्लब पदाधिकाऱ्यांच्या एकत्रित सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रोटरी हेल्थ सोसायटीचे कार्याध्यक्ष दिलीपसिंग बेनीवाल, डॉ. विजय घाटगे, उपाध्यक्ष सुरेश कांबळे, सरचिटणीस जयवंत पाटील यांनी दिली.

या बैठकीस लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंचाचे सचिव रमेश डहाळे व माजी अध्यक्ष रमेश देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिक पदाधिकार्‍यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन रोटरी हेल्थ सोसायटीतर्फे करण्यात आले आहे.

Web Title: By the Rotary Health Society