शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर पंचायत समितीच्या सभापतिपदी शिवसेनेच्या रोहिणी कांगणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:12 IST

सिन्नर: सिन्नर पंचायत समितीच्या सभापतिपदी शिवसेनेच्या गुळवंच गणाच्या सदस्य रोहिणी समाधान कांगणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कांगणे यांच्या ...

सिन्नर: सिन्नर पंचायत समितीच्या सभापतिपदी शिवसेनेच्या गुळवंच गणाच्या सदस्य रोहिणी समाधान कांगणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कांगणे यांच्या निवडीनंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला. सिन्नर पंचायत समितीवर शिवसेनेची सत्ता आहे. १२ पैकी ८ सदस्य शिवसेनेचे असल्याने बिनविरोध निवडीची अपेक्षा होती. त्यानुसार शुक्रवारी पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या विशेष सभेत रोहिणी कांगणे यांची बिनविरोध निवड झाली. पंचायत समितीच्या सभापती शोभा दीपक बर्के यांनी सहकारी सदस्यांना संधी मिळावी यासाठी सभापतिपदाचा राजीनामा दिला होता. तहसीलदार राहुल कोताडे यांच्या अध्यक्षतेखाली व गटविकास अधिकारी मधुकर वाघ यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी ११ वाजता पंचायत समितीच्या सभागृहात विशेष सभेस प्रारंभ झाला. सकाळी ११ ते दुपारी १ या निर्धारित वेळेत रोहिणी कांगणे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. त्यामुळे तहसीलदार कोताडे यांनी कांगणे यांची बिनविरोध निवडीची घोषणा केली. कांगणे यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून पंचायत समिती सदस्य जगन्नाथ भाबड यांनी स्वाक्षरी केली होती.

विशेष सभेस उपसभापती संग्राम कातकाडे, सदस्य भगवान पथवे, सुमन बर्डे, शोभा बर्के, संगीता पावसे, जगन्नाथ भाबड, वेणूबाई डावरे उपस्थित होते. आमदार माणिकराव कोकाटे समर्थक विजय गडाख, रवींद्र पगार, तातू जगताप, योगिता कांदळकर गैरहजर राहिले.

रोहिणी कांगणे यांची सभापतिपदी निवड जाहीर झाल्यानंतर माजी आमदार राजाभाऊ वाजे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, शिवसेना नेते उदय सांगळे यांच्या हस्ते कांगणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दीपक खुळे, संजय सानप, अशोक डावरे, रामनाथ पावसे, पिराजी पवार उपस्थित होते.

-------------------

सिन्नर पंचायत समितीच्या सभापतिपदी रोहिणी समाधान कांगणे यांची बिनविरोध निवड झाली. त्याप्रसंगी माजी आमदार राजाभाऊ वाजे, उदय सांगळे, संग्राम कातकाडे, जगन्नाथ भाबड, मधुकर मुरकुटे, संजय सानप, दीपक खुळे, भगवान पथवे, सुमन बर्डे, संगीता पावसे, वेणूबाई डावरे यांच्यासह शिवसैनिक. (१६ सिन्नर सभापती)

160721\16nsk_20_16072021_13.jpg

१६ सिन्नर सभापती