शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यात शेतकऱ्यांनी कांदा फेकला रस्त्यावर

By admin | Updated: September 10, 2016 00:46 IST

२५ रुपये क्ंिवटल भाव : सटाणा-मालेगाव मार्गावर दोन तास ठिय्या

सटाणा : उन्हाळ कांद्याच्या भावाची घसरण सुरूच असून, शुक्र वारी (दि. ९) सटाणा बाजार समिती आवारात पंचवीस रुपये प्रतिक्विंटलने कांदा विक्री झाल्याने शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या गेटवर कांदा फेकून संताप व्यक्त केला. यानंतर ठिय्या देऊन दोन तास सटाणा-मालेगाव मार्ग रोखून धरला.कांदा भावाची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शुक्र वारी सटाणा बाजार समिती आवारात सकाळी साडेदहा वाजता कांदा लिलाव सुरू झाले. सुरुवातीलाच व्यापाऱ्यांनी तीन वाहनांवरील कांद्याचा लिलाव करण्यास नकार दिला, तर चौथ्या वाहनावरील कांदा भाव दोन रुपयांपासून पुकारा करून फक्त पंचवीस रु पये प्रतिक्विंटल भाव दिला. मातीमोल भावाने कांदा विकला गेल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या गेटवर कांदा फेकून निषेध केला. त्यानंतर चांगल्या कांद्यालादेखील सर्वाधिक दीडशे रु पये क्विंटल भाव मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आपला मोर्चा गेट बाहेर वळवून शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करून सटाणा-मालेगाव रस्त्यावर ठिय्या देऊन दोन तास वाहतूक रोखून धरली. यावेळी शेतकरी संघटनेचे भाऊसाहेब जाधव यांनी शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करत शेतकऱ्यांना अडत मुक्त केल्यामुळे व्यापारी लूट भावाने कांदा खरेदी करत आहेत. या लुटीला सरकारचीदेखील मूक संमती असल्याचा आरोप करण्यात आला. पिंगळवाडे येथील शेतकरी रवींद्र चव्हाण यांनी गुरु वारी कांदा विक्रीसाठी आणला होता. त्यांना प्रतिक्विंटल सव्वा चारशे रु पये भाव मिळाला होता, तोच कांदा शुक्रवारी विक्रीसाठी आणला असता त्याला केवळ दीडशे रु पये भाव मिळाल्याची खंत व्यक्त करत व्यापारीच कांद्याचे भाव पाडत असल्याचे सांगत शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या व्यापाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनात लालजी पवार, देवीदास मांडवडे, विक्र म सोनवणे, सुरेश देवरे, मधुकर बच्छाव, जगदीश काकुळते, साहेबराव निकम, दीपक भोसले, अनिल निकम, नितीन मोरे, रवींद्र मोरे, राहुल सूर्यवंशी, रवींद्र चव्हाण, नंदू देवरे, नितीन भामरे, केदा भामरे, विजय सूर्यवंशी, अनिल जाधव, योगेश जाधव, पंकज जाधव, धनंजय जाधव, बंडू सूर्यवंशी, शरद अहिरे, पंडित वाघ यांच्यासह केरसाने, किकवारी, ठेंगोडा, पीळकोस, सावकी, मुंगसे, पिंगळवाडे, ताहाराबाद, अंतापूर, लखमापूर, ब्राह्मणगाव, आराई, सटाणा, मुंजवाड आदी गावातील कांदा उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते. (वार्ताहर)