रिमझिम पावसाने पिकांना जीवदान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 07:34 PM2020-08-04T19:34:16+5:302020-08-05T00:51:12+5:30

त्र्यंबकेश्वर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून वेगवेगळ्याप्रकारात पावसाने बरसण्यास सुरु वात केली आहे. यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. भात, नागली या मुख्य पिकांची राहिलेली आवणी सहज करता येउ शकेल. कारण आवणीसाठी असाच भिज पाउस हवा असतो.

Rimjim rains save crops! | रिमझिम पावसाने पिकांना जीवदान !

रिमझिम पावसाने पिकांना जीवदान !

googlenewsNext
ठळक मुद्देअशा पावसात भात नागली वरई या पिकांची आवणी सहज होउन जाईल.

लोकमत न्युज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून वेगवेगळ्याप्रकारात पावसाने बरसण्यास सुरु वात केली आहे. यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. भात, नागली या मुख्य पिकांची राहिलेली आवणी सहज करता येउ शकेल. कारण आवणीसाठी असाच भिज पाउस हवा असतो.
त्र्यंबकेश्वर तालुक्यात खरीपाच्या क्षेत्रातील सुमारे ९० टक्के पेरणी पुर्ण झालेली आहे. उर्वरीत पेरणी सध्याच्या रिमझिम पावसात आटोपली जाईल तरी पुढील ीन-चार दिवसात जोरदार पावसाची गरज आहे. असाच पाउस पडुन उन पडल्यास उभ्या पिकांना धोका निर्माण होऊ शकतो. दरम्यान मागच्या वर्षी पेक्षा यावर्षी कमी पाउस असला तरी सध्या तरी पिकांसाठी उपयुक्त असल्याची माहिती तालुका कृषि अधिकारी संदीप वळवी यांनी दिली.
भात, नागली, वरई लावणीसाठी अशाच प्रकारच्या पावसाची गरज असते. सारखी पावसाची झड असली तर या पिकांची आवणी (लावणी) करता येत नाही. अशा पावसात भात नागली वरई या पिकांची आवणी सहज होउन जाईल.
- कैलास मिंदे, शेतकरी, त्र्यंबकेश्वर.

दरम्यान तालुका कृषि विभागाने दिलेल्या पेरणी अहवाला नुसार भात सर्वसाधारण क्षेत्र ११६३४ हेक्टर पैकी ९६५४ हेक्टर पेरणी पुर्ण झाली आहे. नागली ५३९४ हेक्टर पैकी २०६८.३१ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. वरई ३२४१ हेक्टर पैकी ८२५.०६ हेक्टर पेरणी झाली आहे. तर तूरडाळ, मुग, मसुर, उडीद या कडधान्याचे क्षेत्र कमी असल्याने पेरणी पुर्ण झाली आहे. तसेच खुरासणी, भुईमुग, सुर्यफुल, सोयाबीनचे क्षेत्रही कमी असल्याने त्याचीपेरणी पुर्ण झाली आहे. आता फक्त भात नागली व वरई या पिकांचे पेरणीचे उर्वरीत क्षेत्र थोडे असल्याने लवकरच तेही पुर्ण होईल.
या आठवड्यात शंभरटक्के पेरणीचे उद्दीष्ट पुर्ण होईल. श्रावण महिन्यात पावसाचे प्रमाण जास्त असते. पण निम्मा श्रावण होउन गेला तरी दमदार पावसाचा अजुन पत्ता नाही. दोन दिवसांपासून आता कुठे रिमझिम स्वरु पात पाउस सुरु झाला आहे.
या वर्षी आजपर्यंत पडलेला पाऊस...
त्र्यंबकेश्वर ४७३ मि मी. वेळुंजे ६३४ मि मी. व हरसुल ७३४ मि मी. पाऊस आतापर्यंत झाला आहे. तर मागच्या वर्षी आतापर्यंत १४०० मि मी. पाउस झाला होता. (फोटो ०४ टीबीके)

Web Title: Rimjim rains save crops!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.