शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

पालक सचिवांकडून सिंहस्थ कामांचा आढावा

By admin | Updated: November 20, 2014 00:33 IST

पालक सचिवांकडून सिंहस्थ कामांचा आढावा

नाशिक : येत्या मंगळवारी राज्याच्या मुख्य सचिवांच्या उपस्थितीत होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या उच्चाधिकार समितीच्या तयारीचा भाग म्हणून नाशिक दौऱ्यावर आलेले नगरविकास प्रधान सचिव तथा जिल्ह्णाचे पालक सचिव श्रीकांत सिंह यांनी कुंभमेळा अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्यात नाशिक महापालिकेने कामांसाठी निधीची मागणी केली. राज्यात नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर प्रशासकीय पातळीवर पहिल्यांदाच मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत शासनस्तरावर प्रलंबित असलेले काही प्रश्न असतील तर ते मांडण्याची पूर्वतयारी म्हणून श्रीकांत सिंह यांनी माहिती जाणून घेतली. साधुग्रामच्या जागेच्या अधिग्रहणाबाबत उच्च न्यायालयात सुरू असलेल्या दाव्याबाबतही त्यांनी माहिती घेऊन येत्या आठवडाभरात न्यायालयासमोर बाजू मांडण्याबाबत सूचना केली, तर पोलीस दलाकडून अद्यापही सीसीटीव्ही कॅमेऱ्याबाबत निर्णय होत नसल्याने उच्चाधिकार समितीच्या बैठकीत गृह खात्याचे लक्ष वेधण्याचे ठरविण्यात आले. या बैठकीत नाशिक महापालिकेने सिंहस्थ कामांसाठी राज्य शासनाने उर्वरित निधी तत्काळ देण्याची मागणी केली व महापालिकेची आर्थिक स्थिती विशद केली. मुख्य सचिवांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीसाठी सर्व विभागांनी आपली तयारी पूर्ण करावी, अशी सूचना सिंह यांनी केली. (प्रतिनिधी)