बागलाण तालुका ग्रामसेवकांची आढावा बैठक

By Admin | Updated: August 4, 2014 00:57 IST2014-08-03T21:14:53+5:302014-08-04T00:57:52+5:30

बागलाण तालुका ग्रामसेवकांची आढावा बैठक

Review meeting of Baglan Taluka Gramsevak | बागलाण तालुका ग्रामसेवकांची आढावा बैठक

बागलाण तालुका ग्रामसेवकांची आढावा बैठक


सटाणा : १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत शासकीय योजना व नवीन योजनेमार्फत प्रत्येक गावागावात विकासकामांचा ठराव मंजूर करून घ्यावेत, असे आवाहन सभापती गीता सोनवणे यांनी आयोजित ग्रामसेवकांच्या बैठकीत केले.
बागलाण पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. अध्यस्थानी सभापती गीता सोनवणे होते. यावेळी जि. प. सदस्य सुनीता पाटील, उपसभापती मायावती धिवरे, पंचायत समिती सदस्य परशुराम अहिरे, विरेश घोडे, सतीश विसपुते, लक्ष्मण सोनवणे, रेखा ठाकरे, अहल्याबाई माळी, रखमाबाई सोनवणे, जिजाबाई सोनवणे, सोमनाथ सूर्यवंशी, गटविकास अधिकारी महेंद्र कोर उपस्थित होते.
यावेळी तालुक्यातील ग्रामपंचायतींचा वर्गनिहाय आढावा घेण्यात आला. यावेळी ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत सीमेंट रस्ते, इंदिरा आवास घरकुल योजना, सर्वशिक्षा अभियानअंतर्गत बांधकामे, तेरावा वित्त आयोगाची कामे या कामांचा आढावा, ग्रामपंचायत बांधकामांचे माहिती, वृक्ष लागवड आदि विषयांवर आढावा घेण्यात येऊन अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे सूचनादेखील ग्रामसेवकांना देण्यात आले.
रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यातील विहिरीचे कामे पूर्ण झालेली असून, त्यांची बिले अदा करण्यात आलेली नसल्याने आदिवासी भागातील जनता पंचायत समिती कार्यालयात येत असताना त्यांना उडवा उडवीचे उत्तरे मिळत असल्याने पंचायत समिती सदस्य सोमनाथ सूर्यवंशी यांनी नाराजी व्यक्त केली. ग्रामपंचायतीच्या कामांच्या शुभारंभप्रसंगी सदस्यांना निमंत्रित केले जात नसल्याची खंत मनसेचे सदस्य सतीश विसपुते यांनी व्यक्त केली.
या आढावा बैठकीस अधिकारी व ग्रामसेवक उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक विस्तार अधिकारी थोरात यांनी, तर सूत्रसंचालन विस्तार अधिकारी रामकृष्ण खैरणार यांनी केले.

Web Title: Review meeting of Baglan Taluka Gramsevak