शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

चणकापूर उजव्या कालव्याला पाणी सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 23:11 IST

देवळा : चणकापूर धरणातील पाण्याचे आवर्तन चणकापूर उजव्या कालव्याला सोडून देवळा तालुक्यातील पाणीटंचाई दूर करावी, अशी मागणी आमदार डॉ. राहुल आहेर यांच्याकडे मटाणे ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी वाचला तक्रारीचा पाढा

देवळा : चणकापूर धरणातील पाण्याचे आवर्तन चणकापूर उजव्या कालव्याला सोडून देवळा तालुक्यातील पाणीटंचाई दूर करावी, अशी मागणी आमदार डॉ. राहुल आहेर यांच्याकडे मटाणे ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली.

मटाणे गावातील शेतकऱ्यांनी आमदार डॉ. राहुल आहेर यांची देवळा येथे भेट घेऊन तालुक्यातील पाणीटंचाईबाबत माहिती दिली तसेच चणकापूर उजव्या कालव्याला पाणी सोडण्याची मागणी केली. निवेदनात म्हटले आहे, देवळा तालुक्यात चणकापूर उजव्या कालव्यालगत असलेल्या लाभ क्षेत्रातील गावांमध्ये विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे आगामी काळात कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागेल. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना आतापासूनच वणवण भटकण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ह्या सर्व परिस्थितीचा विचार करून चणकापूर उजव्या कालव्यास पिण्याच्या पाण्यासाठी तातडीने आवर्तन सोडून नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर सरपंच भाऊसाहेब आहेर, अनिल पगार, संभाजी पवार, भगवान आहेर, समाधान आहेर, राहुल केदारे, कैलास आहेर, योगेश आहेर, दादाजी आहेर, मनोज आहेर, गुलाब आहेर, कैलास बोरसे, पोपट पवार, विठोबा देवरे, सतीश देवरे, आबा आहेर, चंद्रकांत आहेर, अविनाश आहेर, जनार्दन पाटील, संजय आहेर, शरद वाघ, शैलेंद्र आहेर आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.शेतकऱ्यांनी वाचला तक्रारीचा पाढापरिसरातील सर्व विहिरींनी तळ गाठल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. चणकापूर उजव्या कालव्याला पाणी सोडण्यासाठी दरवर्षी तालुक्यातील शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागत आहे. कालव्याला निश्चित आवर्तन नसल्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांचे पाण्याचे वेळापत्रक कोलमडते. पिकांचे नियोजन करता येत नाही, अशा तक्रारी यावेळी शेतकऱ्यांनी केल्या. दरम्यान, दोन-तीन दिवसात कालव्याला आवर्तन सोडण्यात येईल, असे आश्वासन यावेळी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी दिले. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईFarmerशेतकरी