कुलगुरूपदासाठी विक्रमी अर्ज

By Admin | Updated: January 9, 2017 01:55 IST2017-01-09T01:54:53+5:302017-01-09T01:55:08+5:30

मुक्त विद्यापीठ : सुमारे ७० अर्ज दाखल

Recording application for a wrestler | कुलगुरूपदासाठी विक्रमी अर्ज

कुलगुरूपदासाठी विक्रमी अर्ज

नाशिक : मुक्त विद्यापीठाचे कुलगुरूपद नेहमीच वादग्रस्त ठरल्याने आणि तत्कालीन कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांना अर्ध्यावरच कुलगुरूपदाचा राजीनामा द्यावा लागल्याने मुक्त विद्यापीठात येण्यास फारसे इच्छुक नसल्याची चर्चा होत असतानाच नूतन कुलगुरू निवडीसाठी सुरू असलेल्या प्रक्रियेत यंदा विक्रमी ७० अर्ज दाखल झाल्याचे वृत्त आहे. यामध्ये विद्यापीठातील काही अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे समजते.
विद्यापीठातील नोकरभरती प्रकरणी कर्मचाऱ्यांशी झालेले मतभेद आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडून मिळालेली वागणूक या पार्श्वभूमीवर तत्कालीन कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी राजीनामा दिला. कर्मचाऱ्यांकडून होणारे आरोप आणि राजकीय दबाव यामुळे साळुंखे यांनी राजीनामा दिल्याची चर्चा मात्र लपून राहिलेली नाही. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर नूतन कुलगुरूंची निवडप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दि. ७ रोजी कुलगुरूपदासाठी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख असल्याने अखेरच्या दिवसापर्यंत सुमारे ७० अर्ज दाखल झाल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.

Web Title: Recording application for a wrestler