शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
5
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
6
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
7
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
8
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
9
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
10
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
11
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
12
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
13
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
14
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
15
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
16
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
18
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
19
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
20
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

वसाकासाठी अडीच लाख टन ऊसाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 00:28 IST

लोहणेर : वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याला आगामी गळीत हंगामासाठी ऊसपुरवठा करणाऱ्या उत्पादक शेतकऱ्यांना जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या बरोबरीने भाव ...

ठळक मुद्देगळीत हंगामास प्रारंभ : अन्य कारखान्यांच्या बरोबरीने भाव देण्याची ग्वाही

लोहणेर : वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याला आगामी गळीत हंगामासाठी ऊसपुरवठा करणाऱ्या उत्पादक शेतकऱ्यांना जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या बरोबरीने भाव देण्याबरोबरच मागील देय रक्कम लवकरात लवकर देण्यास भाडेतत्त्वावर घेतलेल्या धाराशिव साखर कारखान्याचे संचालक मंडळ कटिबद्ध आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रातील उत्पादकांनी वसाकालाच ऊस पुरवठा करून गतवैभव प्राप्त करून द्यावे, असे आवाहन आमदार डॉ.राहुल आहेर यांनी केले. दरम्यान, यंदा अडीच लाख मे.टन उसाची नोंद झाल्याची माहिती कारखान्याकडून देण्यात आली.धाराशिव साखर कारखाना संचलित वसाका युनिट -२ चा ब्रॉयलर अग्निप्रदीपन व ऊस मोळी टाकण्याचा कार्यक्र म शनिवारी (दि.१७) आमदार नितीन पवार, आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते वसाका कार्यस्थळावर झाला. यावेळी आहेर बोलत होते अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय संचालक अविनाश महागावकर होते. काही अपप्रवृत्तीमुळे मागील काळात वसाका कर्जाच्या डबघाईत अडकला होता. आता वसाकाला नवसंजीवनी मिळाली असून ऊस उत्पादक, सभासद, कामगारांनी एकजूट दाखवून व्यवस्थापनाला सहकार्य करावे, असे आवाहन आमदार नितीन पवार यांनी केले. ऊस उत्पादक शेतकºयांच्या बांधावर जाऊन वसाकाला जास्तीत जास्त ऊस गाळपासाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही आमदार दिलीप बोरसे यांनी यावेळी दिली. यावेळी वसाकाचे अवसायक राजेंद्र देशमुख, मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक देवरे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक धनंजय पवार, वसाकाचे माजी उपाध्यक्ष संतोष मोरे, भरत पाळेकर, बाळासाहेब बच्छाव,महेंद्र हिरे, भाई दादाजी पाटील, अभीमन पवार, काशीनाथ पवार, आदींसह ऊस उत्पादक, कामगार मोठ्या संख्येने हजर होते. प्रास्तविक व आभार कार्यकारी संचालक अमर पाटील यांनी मानले.ऊस तोडणी टोळ्या तैनातवसाका कार्यक्षेत्रात साधारणत: दोन ते अडीच लाख मेट्रिक टन उसाची नोंद असून कार्यक्षेत्राबाहेरील ऊस आणून जास्तीत जास्त ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट व्यवस्थापनाने ठेवले आहे. त्यादृष्टीने ऊस वाहतूकदार, ऊस तोडणी टोळ्या तैनात करण्यात आल्या आहेत. कार्यक्षेत्रातील उत्पादकांनी वसाकाला उस देऊन सहकार्य करावे, असे आवाहन धाराशिव साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी यावेळी केले.फोटो - १७ वसाका शुगर

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkalwan-acकळवण