मालेगावला पुन्हा रेमडेसिविरचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:12 IST2021-04-19T04:12:51+5:302021-04-19T04:12:51+5:30

सध्या रेमडेसिविरचा तुटवडा पूर्ण महाराष्ट्रात होत आहे. त्यावरून बरेच राजकीय वादळ उठलेले असतांना खासदार डॉ. सुभाष ...

Re-distribution of Remedesivir to Malegaon | मालेगावला पुन्हा रेमडेसिविरचे वाटप

मालेगावला पुन्हा रेमडेसिविरचे वाटप

सध्या रेमडेसिविरचा तुटवडा पूर्ण महाराष्ट्रात होत आहे. त्यावरून बरेच राजकीय वादळ उठलेले असतांना खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांच्या नेतृत्त्वात सदर पुरवठा करण्यात आला. खासदार भामरे यांनी मुबलक प्रमाणात इंजेक्शन कसे उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्न केले. पूर्ण धुळे लोकसभा मतदार संघात हा साठा पुरविण्यात आला. त्यांनी आज शंभर इंजेक्शनचे वाटप आलेल्या किमतीत केले. यावेळी सिक्ससिग्मा हॉस्पिटलनेदेखील आलेल्या किमतीतच रुग्णांना रेमडेसिविर देण्यास पक्षाला मदत केली, याबद्दल देवा पाटील यांनी त्यांचे आभार मानले. यावेळी सुरेश निकम, लकी गिल, संजय काळे, हरिप्रसाद गुप्ता, नीलेश कचवे, मुकेश झुणझुणवाला, पप्पू पाटील, कमलेश सोनवणे व पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Re-distribution of Remedesivir to Malegaon