रवींद्र चव्हाण सातपूर श्रीचा मानकरी

By Admin | Updated: December 30, 2014 00:20 IST2014-12-30T00:19:53+5:302014-12-30T00:20:39+5:30

रवींद्र चव्हाण सातपूर श्रीचा मानकरी

Ravindra Chavan Satpur Shri Manakari | रवींद्र चव्हाण सातपूर श्रीचा मानकरी

रवींद्र चव्हाण सातपूर श्रीचा मानकरी

  नाशिक : जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनेच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शरीसौष्ठव सातपूर श्री चा मान फिटनेस जिमचा रवींद्र चव्हाण याने पटकावला़ सातपूर येथे झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन सुरेश भंदुरे यांच्या हस्ते झाले़ यावेळी संघटनेचे गोविंद काळे, प्रकाश मौले, आदेश दादावाला, डॉ़ सुजय काळे, नीलेश बंधुरे आदि उपस्थित होते़ विविध वजनी गटांत झालेल्या या स्पर्धेत जिल्'ातील २०० खेळाडूंनी सहभाग घेतला़ विजेत्यांना शिवसेनेचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांच्या हस्ते गौरविण्यात आले़ स्पर्धेत पंच म्हणून गोपाळ गायकवाड, रवींद्र वरपे, मंगेश सोमवंशी, डॉ़ अनिमेष पाटील, मयूर देवरे, गणेश भुजबळ यांनी काम पाहिले़ विजेते प्रथम पाच स्पर्धक याप्रमाणे - ६० किलो - ज्ञानेश्वर म्हस्के, शंकर चव्हाण, सोनू वाघ, प्रवीण नाईक, गोपीनाथ भोये़ ६५ किलो - दीपक चौधरी, सुभाष घुगे, दिनेश हेडवे, सचिन खांडवी, सागर सावंत़ ७० किलो - अमोल जाधव, आशिष सिंग, बंटी बाविस्कर, युवराज मुकणे, शिवम बहोत़ ७५ किलो - स्वप्नील शेजवळ, सुरेश आरमूग, राजू जैस्वाल, अनंत कदम, राम काळे़ ८० किलो - रवींद्र चव्हाण, रशिद जिलानी, प्रशांत जाधव, तन्जीम शेख, अशरफ शेख़

Web Title: Ravindra Chavan Satpur Shri Manakari