शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

रंगपंचमी : ४० वर्षांनंतर पुरातन रहाड खुली

By admin | Updated: March 13, 2017 20:54 IST

रहाडींमधील रंगपंचमीला ऐतिहासिक महत्त्व असल्याने आजही शहरातील अनेक भागात रहाडींमध्ये रंग खेळला जातो.

संदीप भालेराव नाशिक : रहाडींमधील रंगपंचमीला ऐतिहासिक महत्त्व असल्याने आजही शहरातील अनेक भागात रहाडींमध्ये रंग खेळला जातो. रहाडीची परंपरा आणि ऐतिहासिक महत्त्व असल्याने अवघे नाशिककर दरवर्षी रहाडीतील रंगात रंगून जातात. नाशिकची रंगपंचमी ओळखली जाते ती रहाडींमुळेच. शहरात काही पुरातन रहाडी असून, आणखी एका रहाडचा शोध लागला आहे. तब्बल ४० वर्षांनंतर या रहाडविषयी तांबट आळीतील नागरिकांना माहिती झाली आहे. यंदा ही रहाड रंगपंचमीला खुली केली जाणार आहे. नाशिकमध्ये तिवंधा चौक, दिल्ली दरवाजा, शनि चौक येथे पुरातन आणि पेशवेकालीन रंगांच्या रहाडी आहेत. या रहाडींमध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात रंगपंचमी खेळली जाते. नाशिकची रंगपंचमी आणि रहाड यांचे घट्ट नाते असून, देश-विदेशात नाशिकची रंगपंचमी रहाडींसाठी ओळखली जाते. तांबट आळीत आणखी एक रहाड आता सज्ज झाली आहे. मनोज लोणारी यांनी याबाबतीत पुढाकार घेऊन ही रहाड समोर आणली आहे. लोणारी यांच्या वडिलांकडून त्यांना तांबट आळीतील रहाडीबाबत माहिती मिळाली. त्याबरोबरच त्यांनी परिसरातील आणखी काही ज्येष्ठ आणि वयोवृद्धांशी चर्चा केल्यानंतर तांबट आळीतील रहाडीबाबत त्यांना तथ्य आढळले. आपल्या गल्लीतीलच रहाड गेल्या ४० वर्षांपासून बंद असल्याने ती खुली झाली पाहिजे यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. नगरसेवक गजानन शेलार आणि राहुल शेलार यांचे त्यांना सहकार्य लाभले. परिसरातील मंडळे एकत्र आली आणि रहाडीचा शोध सुरू झाला.

एका ठिकाणी खोदकाम करण्यात आल्यानंतर रहाड नसल्याचे लक्षात आले. निराश न होता त्यांनी दुसऱ्या ठिकाणी खोदकाम केल्यानंतर तेथे १६ फूट खोल रहाड आढळून आली. खोदकाम करताना दगडी चिऱ्यांचा हौद सापडला. १८ बाय १८ आकाराचा हौद पाहण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी झाली. ४० वर्षांनंतर रहाड सुरू होईल, याचा आनंद व्यक्त करण्यात आला.