‘रामलल्ला हम आयेंगे...’गजर : पंचमुखी हनुमान मंदिरात ध्वजपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 01:22 IST2020-08-04T23:43:16+5:302020-08-05T01:22:39+5:30
पंचवटी : ‘धर्म की जय हो, अधर्म का नाश हो,’ ‘रामलल्ला हम आयेंगे ,’ ‘जय सिता राम सिता’ असा जयघोष करत अयोध्या येथे उभारण्यात येणाऱ्या राममंदिर भूमिपूजन पार्श्वभूमीवर पंचवटीतील जुना आडगाव नाक्यावरील पंचमुखी हनुमान मंदिरात नाशिक धर्मसभा, विश्व हिंदू परिषद, हिंदू एकता आंदोलन, पुरोहित संघ व साधू-महंतांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि.४) सकाळी सामूहिक रामरक्षा, हनुमान चालिसा पठण करण्यात आली.

‘रामलल्ला हम आयेंगे...’गजर : पंचमुखी हनुमान मंदिरात ध्वजपूजन
लोकमत न्यूज नेटवर्क
पंचवटी : ‘धर्म की जय हो, अधर्म का नाश हो,’ ‘रामलल्ला हम आयेंगे ,’ ‘जय सिता राम सिता’ असा जयघोष करत अयोध्या येथे उभारण्यात येणाऱ्या राममंदिर भूमिपूजन पार्श्वभूमीवर पंचवटीतील जुना आडगाव नाक्यावरील पंचमुखी हनुमान मंदिरात नाशिक धर्मसभा, विश्व हिंदू परिषद, हिंदू एकता आंदोलन, पुरोहित संघ व साधू-महंतांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि.४) सकाळी सामूहिक रामरक्षा, हनुमान चालिसा पठण करण्यात आली. भूमिपूजन सोहळा आणि मंदिर उभारणी काम निर्विघ्न पार पडावे यासाठी श्रीफळ वाढवून येऊन यावेळी ध्वजपूजन करण्यात आले.
अयोध्या येथे उभारण्यात येणाºया राममंदिर भूमिपूजन सोहळा बुधवारी (दि.५) होत असून, त्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये असलेल्या विविध देवदेवतांच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ करण्यात आला. श्रीराम वनवासात गेले होते. त्यावेळी त्यांचे नाशिकला काहीकाळ वास्तव्य होते. त्यामुळे नाशिक पुण्यभूमी बनली आहे. सध्या देशभरात कोरोना सावट असल्याने साधू-महंत व भाविकांना अयोध्येत भूमिपूजन सोहळ्यात सहभागी होता येणार नाही म्हणून आहे त्याठिकाणी रामनामाचा गजर करत भूमिपूजन सोहळा साजरा केला जात आहे. मंगळवारी सकाळी पंचमुखी हनुमान मंदिरात साधू-महंतांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीराम, हनुमान मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर टाळ-मृदुंगांच्या गजरात भजन कीर्तन कार्यक्रम झाला. यावेळी उपस्थित साधू-महंतांनी सामूहिक ध्वजपूजन करून अयोध्या येथे उभारण्यात येणाºया राममंदिर भूमिपूजन व बांधकाम लवकरात लवकर पूर्ण व्हावे व निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी श्रीफळ वाढविण्यात आले. त्यानंतर मंदिरात महाआरती करण्यात आली. यावेळी पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत भक्तिचरणदास, महंत राजारामदास, बालकदास, रामतीर्थ महाराज, सतीश शुक्ल, भानुदास शौचे, माधवदास राठी, माजी आमदार बाळासाहेब सानप, रामसिंग बावरी, विराज लोमटे आदींसह साधू- महंत उपस्थित होते. मंदिरात तासभर रामनामाचा जयजयकार सुरू असल्याने परिसर जयघोषाने दुमदुमून गेला होता.
मंदिर वही बनायेंगे
पंचमुखी हनुमान मंदिरात सामूहिक रामरक्षा आणि हनुमान चालिसा पठण झाल्यानंतर उपस्थित साधू- महंतांनी रामलल्ला हम आयेंगे मंदिर वही बनायेंगे, बच्चा बच्चा राम का जन्मभूमी के काम का, धर्म की जय हो, अधर्म का नाश हो अशा घोषणा देण्यात आल्या.
प्रभुरामांना साकडे
संपूर्ण देशभरात सध्या कोरोना सावट पसरलेले आहे. देशात पसरलेले कोरोना संकट लवकर दूर व्हावे आणि विस्कळीत झालेले जनजीवन पुन्हा पूर्ववत व्हावे यासाठी उपस्थित साधू-महंतांनी मंदिरात पूजन करून प्रभू रामचंद्रांना साकडे घातले.