राजस्थानातील भाजप खासदाराची रेंज रोव्हर कार खाक; नाशिक-मुंबई महामार्गावर घटना : सुदैवाने खासदारासह सहकारी बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 06:31 IST2026-02-15T06:31:05+5:302026-02-15T06:31:57+5:30

शॉर्टसर्कीटमुळे कारने पेट घेतल्याचे सांगितले जाते. अशाच प्रकारे शॉर्टसर्कीटमुळे आग लागण्याच्या अनेक घटना महामार्गावर घडल्या आहेत.

Rajasthan BJP MP's Range Rover car burnt to ashes; Incident on Nashik-Mumbai highway: Fortunately, MP and colleagues escaped unhurt | राजस्थानातील भाजप खासदाराची रेंज रोव्हर कार खाक; नाशिक-मुंबई महामार्गावर घटना : सुदैवाने खासदारासह सहकारी बचावले

राजस्थानातील भाजप खासदाराची रेंज रोव्हर कार खाक; नाशिक-मुंबई महामार्गावर घटना : सुदैवाने खासदारासह सहकारी बचावले

वाडीवऱ्हे (जि. नाशिक) : नाशिक-मुंबई महामार्गावर राजस्थानातील भाजप खासदाराच्या धावत्या रेंज रोव्हर कारला शुक्रवारी मध्यरात्री आग लागली. त्यात कार जळून खाक झाली. कारचालकाच्या प्रसंगावधानामुळे खासदारासह कारमधील सर्व प्रवासी  बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, राजस्थानच्या जालोर-सिरोही लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार लुम्बाराम चौधरी हे वाशिम येथून त्र्यंबकेश्वर येथे ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी आले होते.

शॉर्टसर्कीटमुळे कारने पेट घेतल्याचे सांगितले जाते. अशाच प्रकारे शॉर्टसर्कीटमुळे आग लागण्याच्या अनेक घटना महामार्गावर घडल्या आहेत.

सुदैवाने खासदारासह सहकारी बचावले

सदर कारवर शहापूर येथील अनिल बबन जाधव (४०) हे चालक होते. कार गोंदे फाटा परिसरातून मध्यरात्रीच्या सुमारास जात असताना आग लागली. चालकाने गाडी तत्काळ रस्त्याच्या कडेला उभी केली. सुदैवाने कारमधील सर्व प्रवासी कारने पेट घेताच  सुखरूप बाहेर पडले.  त्यामुळे खासदार चौधरी यांच्यासह सहकारी बचावले आणि मोठा अनर्थ टळला.

Web Title : राजस्थान के भाजपा सांसद की रेंज रोवर नाशिक-मुंबई राजमार्ग पर जली।

Web Summary : राजस्थान के भाजपा सांसद की रेंज रोवर नाशिक-मुंबई राजमार्ग पर आग लगने से जल गई। चालक की समझदारी से सांसद और उनके सहयोगी सुरक्षित बच गए। गोंदे फाटा के पास शॉर्ट सर्किट से आग लगने का संदेह है।

Web Title : Rajasthan BJP MP's Range Rover gutted on Nashik-Mumbai highway.

Web Summary : A Rajasthan BJP MP's Range Rover caught fire on the Nashik-Mumbai highway. The MP and his colleagues escaped unharmed due to the driver's quick thinking. Short circuit is suspected to be the cause of the fire near Gondhe Phata.