शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
2
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
7
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
11
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
12
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
13
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
14
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
15
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
16
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
17
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
18
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
19
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
20
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
Daily Top 2Weekly Top 5

परतीचा पाऊस राहणार दमदार

By admin | Updated: September 7, 2016 00:53 IST

परतीचा पाऊस राहणार दमदार

नाशिक : पुनर्वसू आणि आश्लेषा नक्षत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर आणि दारणा धरण ९० टक्क्यांपेक्षा जास्त भरले आहे. सध्या पावसाने ओढ दिली असली तरी सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये परतीचा पाऊस दमदार राहणार असल्याचे भाकीत पंचांगकर्त्यांनी वर्तविलेले आहे. दरम्यान, गणेशोत्सवाच्या उत्तरार्धात चांगल्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. शहरात जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पुनर्वसू नक्षत्रात तर आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात आश्लेषा नक्षत्रात पावसाने दमदार हजेरी लावली होती. १० जुलै रोजी झालेल्या पावसामुळे गंगापूर आणि दारणा धरणातील पाणीसाठा ५० टक्क्यांच्या आसपास जाऊन पोहोचला होता. त्यानंतर दि. २ आॅगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीने गोदावरीसह सर्व नद्या दुथडी भरून वाहिल्या होत्या. महापुरामुळे आणि गंगापूर धरणातील पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यवृष्टीमुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ पाटबंधारे विभागावर आली होती. आता गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाने ओढ दिली असून, अधूनमधून तुरळक सरी कोसळत असतात. मघा आणि पूर्वा नक्षत्रात समाधानकारक पाऊस झाला नाही. सध्या पूर्वा नक्षत्र सुरू असून, गाढव या वाहनावर स्वार होऊन आलेल्या या नक्षत्रातील उत्तरार्धात म्हणजे ९ ते १२ सप्टेंबर या कालावधीत बऱ्यापैकी पावसाचे भाकीत पंचांगकर्त्यांनी वर्तविले आहे. दि. १३ सप्टेंबरला सूर्य उत्तरा नक्षत्रात प्रवेश करणार असून, त्यावेळी १३ आणि १४ सप्टेंबरला तसेच १८ ते २२ सप्टेंबरला चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सध्या गणरायाचे आगमन झाले असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. गणेशोत्सवाच्या उत्तरार्धात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असल्याने गणेशभक्तांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. दि. २६ सप्टेंबरला हस्त नक्षत्र लागणार असून, या नक्षत्राच्या सुरुवातीलाच दमदार पावसाचे भाकीत वर्तविण्यात आले आहे. त्यामुळे परतीचे पाऊसमान चांगले राहणार आहे. अखेरच्या चित्रा आणि स्वाती नक्षत्रात मात्र मध्यम पावसाचे भाकीत वर्तविण्यात आले आहे.