शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
3
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
4
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
5
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
6
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
7
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
8
Top Marathi News LIVE Updates: १ मेपासून मराठीची मोहीम सुरूच राहणार; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
9
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
10
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
11
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
12
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
13
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
14
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
15
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
16
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
17
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
18
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
19
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
20
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कळवण तालुक्यात पावसाचे थैमान

By admin | Updated: August 3, 2014 02:04 IST

कळवण तालुक्यात पावसाचे थैमान

 

कळवण : तालुक्यात गेल्या आठ दिवसांत झालेल्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नद्या-नाल्यांना आलेल्या पुरामुळे पाडे- वस्त्यांचा संपर्क तुटला असून, परिस्थिती आता पूर्वपदावर येत आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू असल्याची माहिती तहसीलदार अनिल पुरे यांनी दिली. दरम्यान, शिंगाशीला अनोळखी युवकाचे शव आढळून आले आहे.सप्तशृंग गडावर झालेल्या मुसळधार पावसाने बेहडी नदीला आलेल्या पूर पाण्यामुळे मानूर गावाजवळ कोल्हापूर फाट्यानजीक बंधाऱ्याचा भराव खचल्याने शशिकांत अहेर यांच्या मक्याच्या शेतीमध्ये पाणी घुसले. यात मक्याचे चार एकर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. तसेच मानूर येथेच बेहडी नदीकाठावरील मनोहर पवार यांच्या शेतात पाणी घुसल्यामुळे नदीकाठी असलेल्या शेतात खड्डे निर्माण झाले असून, पिकांचे नुकसान झाले आहे. या ठिकाणी तलाठी एम. एस. कापडणीस यांनी पंचनामा केला आहे. शहरात असलेल्या भवानी कॉम्प्लेक्स बिल्ंिडगची संरक्षक भिंत पावसामुळे पडली असून, या ठिकाणी असलेल्या वीजरोहित्राची माती खचल्यामुळे तिरपी झाली आहे. तालुक्यातील जांभाळ व महाल भागातील रस्ते उखडून गेले आहे. कळवण ते सुरगाणा तालुक्यांचा संपर्क तुटला असून, मांगलीदर, वीरशेत, राठीआंबा, जिरवाडे, धनोली, शृंगारवाडी आदि १२ ते १३ खेड्यांवरील २५० आदिवासी विद्यार्थी दळवट गावापर्यंत पायपीट करून महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. दळवट ते शृंगारवाडीपर्यंत असलेल्या नदीनाल्यावरील पुलाची बांधकामे पूर्ण करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाची यंत्रणा अपयशी ठरली आहे. यंत्रणा या भागापर्यंत पोहोचली नसल्याची तक्रार जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार यांनी केली आहे.भाताची लागवड बंदगेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे पश्चिम भागातील भात लागवडीचे काम ठप्प झाले आहे. भाताची रोपे तयार झाली असून, पावसाने उघडीप न दिल्याने यावर्षी भात लागवड सुरुवात झाली नसल्याचे तालुका कृषी अधिकारी जितेंद्र शहा यांनी सांगितले. पावसामुळे सर्वच नद्यांना पूर आला आहे. शिंगाशी येथे तांबडी नदीपात्रात एक युवकाचे शव आढळून आले. त्याची ओळख पटली नसून अभोणा पोलिसांत अज्ञात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी दिली. (वार्ताहर)