निफाड, लासलगावला रेल्वे आरक्षण कार्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 01:57 IST2020-07-11T22:43:03+5:302020-07-12T01:57:17+5:30

भुसावळ रेल्वे मंडळमध्ये तिकीट आरक्षण व तिकीट रद्द करण्यासाठी सोमवारी (दि.१३) पासून नऊ ठिकाणी आरक्षण कार्यालय सुरू होणार आहे. यासाठी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत एका शिफ्टमध्ये आरक्षण खिडकी सुरू राहणार आहे.

Railway Reservation Office at Niphad, Lasalgaon | निफाड, लासलगावला रेल्वे आरक्षण कार्यालय

निफाड, लासलगावला रेल्वे आरक्षण कार्यालय

नाशिकरोड : भुसावळ रेल्वे मंडळमध्ये तिकीट आरक्षण व तिकीट रद्द करण्यासाठी सोमवारी (दि.१३) पासून नऊ ठिकाणी आरक्षण कार्यालय सुरू होणार आहे. यासाठी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत एका शिफ्टमध्ये आरक्षण खिडकी सुरू राहणार आहे.
कोरोना लॉकडाऊनमुळे रेल्वे प्रवासी वाहतूक सेवा रद्द करण्यात आली होती. यामुळे रद्द झालेल्या रेल्वेचे आरक्षण तिकीट रद्द करून रिफंड देण्यासाठी मध्य रेल्वे विभागातील निफाड, लासलगाव, बोदवड, नांदुरा, खामगाव, मूर्तिजापूर, कारंजा, रावेर, जामनेर या नऊ ठिकाणी रेल्वे तिकीट आरक्षण रद्दची सुविधा सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहे. आरक्षण तिकीट रद्द करण्यात येताना संबंधिताने मास्क लावून यावे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Web Title: Railway Reservation Office at Niphad, Lasalgaon

टॅग्स :railwayरेल्वे