मसगा महाविद्यालयात रासेयो स्थापना दिवस साजरा

By Admin | Updated: September 28, 2014 23:51 IST2014-09-28T23:51:28+5:302014-09-28T23:51:59+5:30

मसगा महाविद्यालयात रासेयो स्थापना दिवस साजरा

Raasio celebrates the establishment day at Massaga College | मसगा महाविद्यालयात रासेयो स्थापना दिवस साजरा

मसगा महाविद्यालयात रासेयो स्थापना दिवस साजरा

मालेगाव : येथील मसगा महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा करण्यात आला. मालेगाव रक्तपेढीचे अध्यक्ष दिलीप भावसार यांनी उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुभाष भामरे होते.
कार्यक्रमाची सुरूवात छायाचित्र प्रदर्शनातून करण्यात आली. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची खाद्यपदार्थ स्वत: तयार करून मांडले. शिवाय मेहंदी व वेशभूषा आणि केशभूषा उपक्रम घेण्यात आले. जलसाक्षरता विषयावर नाटिका सादर झाली.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे कलागुण सादर केले. डॉ. दिलीप भावसार यांनी रासेयोद्वारा राबवलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. याप्रसंगी संभाजी शेवाळे, राहुल पवार, उपप्राचार्य डॉ. आर. एस. देवरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सूत्रसंचालन जयराम माळी यांनी, तर आभार अमोल पवार यांनी मानले.

Web Title: Raasio celebrates the establishment day at Massaga College