एलएलबीसाठी सोमवारी गुणवत्ता यादी

By Admin | Updated: September 10, 2016 01:04 IST2016-09-10T01:04:07+5:302016-09-10T01:04:17+5:30

प्रवेशप्रक्रिया : पसंतीक्रम भरण्यास विद्यार्थ्यांना रविवारपर्यंत मुदत

Quality list for LLB on Monday | एलएलबीसाठी सोमवारी गुणवत्ता यादी

एलएलबीसाठी सोमवारी गुणवत्ता यादी

नाशिक : विधी शाखेतील अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेस विलंब झाल्याने विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरण्यास रविवारपर्यंत (दि. ११) मुदत देण्यात आली असून सोमवारी (दि. १२) गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.
बार कौन्सिल आॅफ इंडियाच्या अटीनुसार आणि सीईटी परीक्षेच्या पात्रतेनुसार ही प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. न्यायालयाने विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेसाठी कौन्सिलचे नियम विचारात घेण्याची सूचना केल्यानंतर कौन्सिलने त्यांच्या नियमांना अधीन राहून राज्यातील विधी महाविद्यालयांतील अभ्यासक्रम पूर्ण करण्यास मान्यता दिली. त्यानुसार प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्याने प्रवेशप्रक्रियेचा मार्ग सुकर झाला आहे. दरम्यान, कौन्सिलने निदर्शनास आणून दिलेल्या त्रुटींची पूर्तता करण्याबाबत महाविद्यालयांकडून हमीपत्र घेण्यात आले आहे. त्यामुळे महाविद्यालयांना त्यानुसार कार्यवाही करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Quality list for LLB on Monday