चांदोरी येथे जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 00:45 IST2021-04-27T23:01:08+5:302021-04-28T00:45:02+5:30

चांदोरी : संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने टाळेबंदी करण्यात आली आहे. ग्रामीण भागात त्याचे तंतोतंत पालन होत असले तरी मात्र रुग्ण वाढत आहे. निफाड तालुक्यातील गोदाकाठ भागात झपाट्याने रुग्ण वाढत असल्याने चांदोरी ग्रामपालिका व कोरोना नियंत्रण समितीने गावातील रुग्णवाढ थांबविण्यासाठी आता जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे.

Public curfew at Chandori | चांदोरी येथे जनता कर्फ्यू

चांदोरी येथे जनता कर्फ्यू

ठळक मुद्देवैद्यकीय सेवावगळता सर्व आस्थापने बंद ठेवण्यात येणार

चांदोरी : संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने टाळेबंदी करण्यात आली आहे. ग्रामीण भागात त्याचे तंतोतंत पालन होत असले तरी मात्र रुग्ण वाढत आहे. निफाड तालुक्यातील गोदाकाठ भागात झपाट्याने रुग्ण वाढत असल्याने चांदोरी ग्रामपालिका व कोरोना नियंत्रण समितीने गावातील रुग्णवाढ थांबविण्यासाठी आता जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे.

५ मेपर्यंत वैद्यकीय सेवावगळता सर्व आस्थापने बंद ठेवण्यात येणार आहे. विनामास्क, विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली चांदोरी परिसरात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. (२७ चांदोरी)

Web Title: Public curfew at Chandori