शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

प्रचाराला उरले अवघे सहा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 01:02 IST

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे सहा दिवस शिल्लक राहिल्याने प्रत्येक भागातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची दमछाक होत असून, रात्रीचा दिवस करावा लागत आहे. हाती असलेला कालावधी लक्षात घेता, विधानसभा मतदारसंघाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाणे शक्य नसल्याचे पाहून उमेदवारांनी कार्यकर्त्यांकरवी मतदारांपर्यंत आपले प्रचारसाहित्य पुरविण्यावर भर दिला आहे.

ठळक मुद्देउमेदवारांची दमछाक : मतदारांपर्यंत पोहोचण्याची धडपड

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे सहा दिवस शिल्लक राहिल्याने प्रत्येक भागातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची दमछाक होत असून, रात्रीचा दिवस करावा लागत आहे. हाती असलेला कालावधी लक्षात घेता, विधानसभा मतदारसंघाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाणे शक्य नसल्याचे पाहून उमेदवारांनी कार्यकर्त्यांकरवी मतदारांपर्यंत आपले प्रचारसाहित्य पुरविण्यावर भर दिला आहे.विधानसभा निवडणुकीच्या दोन महिने अगोदरपासून प्रत्येक इच्छुक उमेदवाराने मतदारसंघाचा राजकीय व सामाजिक अभ्यास करण्याबरोबरच, ठिकठिकाणच्या समर्थक, हितचिंतकांचे मेळावे, बैठका घेऊन निवडणुकीचा कल जाणून घेतला असला तरी, प्रत्यक्ष नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत सर्वच राजकीय पक्षांमध्ये उमेदवारी वाटपावरून साठमारी सुरू असल्यामुळे जोपर्यंत पक्षाची अधिकृत उमेदवारी हातात पडत नाही, तोपर्यंत उमेदवारीबाबत निश्चितता नव्हती. पक्षाकडून उमेदवारी दाखल केल्यानंतर छाननी व माघारीपर्यंत सर्वच उमेदवारांचा जीव टांगणीला लागून होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या खºया प्रचाराला ७ आॅक्टोबरपासून सुरुवात करण्यात आली. सुरुवातीचे चार दिवस तर उमेदवारांचे विविध भागांमध्ये संपर्क कार्यालये उघडण्यात व कार्यकर्त्यांवर जबाबदारीचे वाटप करण्यात गेले. त्यानंतर मात्र मतदारसंघात नेत्यांच्या प्रचारसभांच्या आयोजनात उमेदवारांचा वेळ खर्ची पडला. निवडणुकीचा प्रचार सुरू होऊन सात दिवस उलटले असून, पहिल्या टप्प्यात शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी कॉँग्रेसने बºयापैकी आघाडी घेतली आहे. त्यांच्या त्यांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रामदास आठवले, छगन भुजबळ, डॉ. अमोल कोल्हे यांचे जिल्ह्यात दौरेही झाले असून, प्रचाराच्या अंतिम टप्प्यात शरद पवार, राज ठाकरे आदींच्या सभा घेण्याचे घाटत आहे. जिल्ह्यात कॉँग्रेसच्या एकाही राज्यस्तरीय नेत्याची सभा होऊ शकलेली नाही.विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उमेदवारांना पंधरा दिवसांचा कालावधी मिळणार असल्याचे निवडणूक कार्यक्रमावरून दिसत असले तरी, २१ आॅक्टोबर रोजी मतदान होणार असल्याने मतदानाच्या ४८ तास अगोदर जाहीर प्रचाराला निवडणूक आयोगाने मज्जाव केला आहे. त्यामुळे शनिवार, दि. १९ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेनंतर उमेदवारांना नाईलाजाने प्रचार आटोपता घ्यावा लागणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nashikनाशिक