महामुक्काम मोर्चा स्थगित

By Admin | Updated: March 31, 2016 00:12 IST2016-03-31T00:10:42+5:302016-03-31T00:12:56+5:30

महामुक्काम मोर्चा स्थगित

Prohibition of Mahamukkam Front | महामुक्काम मोर्चा स्थगित

महामुक्काम मोर्चा स्थगित


बीड : तालुक्यातील म्हाळसजवळा येथील कथित मग्रारोहयोतील गैरव्यवहार प्रकरणी अखेर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बुधवारी जि. प. सीईओंना गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले.
नारायण राऊत यांनी या संदर्भात मजूर कामावर हजर नसताना परस्पर मजुरी उचलल्याची तक्रार केली होती. १८८२ असलेल्या लोकसंख्येच्या गावात सुमारे १३९५ मजूर रोहयोच्या कामावर दाखविण्यात आले होते. शिवाय तब्बल ३० कामे एकाचवेळी सुरू होती. त्यानंतर राऊत यांनी उपोषण करून या गैरव्यवहाराकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर चौकशी झाली होती. त्यामध्ये लेखी जवाब घेतले होते.
चौकशीत तथ्य आढळल्यामुळे सरपंच, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक व पोस्ट मास्तर यांच्याविरूध्द आर्थिक अपहार व बनावट कागदपत्रे बनवून फसवणूक केल्याचा ठपका ठेवत फौजदारी कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी राम म्हणाले, दोषींवर योग्य ती कारवाई होईल. चौकशी अहवाल मी स्वत: पाहिला असून, तो गंभीर आहे. या प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Prohibition of Mahamukkam Front