शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

भोकणीत ‘प्रगती’ पॅनेलने गड राखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सिन्नर : भोकणी येथील ग्रामपंचायतीच्या चुरशीच्या लढतीत प्रगती पॅनेलने ९ पैकी ५ जागा जिंकून परिवर्तन ग्रामविकास ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सिन्नर : भोकणी येथील ग्रामपंचायतीच्या चुरशीच्या लढतीत प्रगती पॅनेलने ९ पैकी ५ जागा जिंकून परिवर्तन ग्रामविकास पॅनेलचा पराभव केला. ‘प्रगती’चे नेते बाजार समितीचे माजी सभापती अरुण वाघ हे याआधीच बिनविरोध निवडून आल्याने या पॅनेलच्या सदस्यांची संख्या सहा झाली आहे. अरुण वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगती पॅनेलची निर्मिती करण्यात आली होती. वाघ यांनी केवळ विकासाच्या मुद्द्यावर मतदारांना साद घातली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले. प्रभाग क्रमांक १ मध्ये ग्रामविकास पॅनेलचे ज्योती राजू सानप (४०३), शिवाजी निवृत्ती सानप (३२१), माया आण्णा सानप (४११) यांनी प्रगतीचे सुनील शिवाजी वाघ (१२), शोभा रंगनाथ्लू कुर्‍हाडे (५३) श्वेता शरद साबळे (४६) तसेच स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरलेले सुरेश किसन सानप (१), रंगनाथ्लू रघुनाथ्लू सानप (१२४) यांचा दारुण पराभव केला. प्रभाग क्रमांक २ मध्ये प्रगती पॅनेलचे शरद बाळनाथ्लू साबळे (३८७), अलका रमेश साबळे (४१५), मनिषा सुरेश साबळे (४१५) यांनी ग्रामविकासचे संगीता सुनील साबळे (३३५), शारदा दामू सांगळे (२९८), भास्कर शिवराम साबळे (३४३) यांना पराभवाची धूळ चारली. प्रभाग क्रमांक ३ मध्ये ‘प्रगती’चे कांताराम निवृत्ती कुर्‍हाडे (३२३), सोनाली तुकाराम डावखर (३२३) यांनी ज्ञानेश्वर रामचंद्र कुर्‍हाडे (१२०) व अनिता भिवाजी कुर्‍हाडे (११३) यांना धोबीपछाड दिला.

--------------------

अरुण वाघ यांचे पुन्हा वर्चस्व सिध्द

भोकणी ग्रामपंचायतीवर बाजार समितीचे माजी सभापती, माजी सरपंच अरुण वाघ यांचे वर्चस्व सिध्द झाले आहे. गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीत वाघ यांनी ग्रामपंचायतीची सत्ता काबीज केली असून, विकासकामांच्या माध्यमातून जनाधार टिकवून ठेवण्यात यश मिळवले आहे. यापूर्वी वाघ स्वत: तसेच त्यांच्या पत्नी ज्योती वाघ या सरपंचपदी विराजमान होत्या.

---------------------

फोटो ओळी- सिन्नर तालुक्यातील भोकणी ग्रामपंचायतीवर प्रगती पॅनेलने सत्ता मिळवल्यानंतर पॅनलचे नेते अरुण वाघ व कार्यकर्ते यांनी जल्लोष केला. (२२ भोकणी)

===Photopath===

220121\22nsk_5_22012021_13.jpg

===Caption===

(२२ भोकणी)