शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक संस्थांच्या जागा परत घेण्याची तयारी

By admin | Updated: October 9, 2015 23:04 IST

मेट, मराठा संस्थेचा समावेश : शासनाकडे प्रस्ताव रवाना

नाशिक : शैक्षणिक प्रयोजनासाठी अल्पदरात शासकीय जमिनी ताब्यात घेतल्यानंतर त्याचा तीन वर्षांच्या आत उपयोग न करणाऱ्या शैक्षणिक संस्थांच्या ताब्यातील जागा पुन्हा शासन जमा करण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाने सुरू केली असून, यात नाशिक जिल्ह्यातील नऊ संस्थांचा समावेश आहे. राज्य शासनाच्या आदेशाने सुरू झालेल्या या कारवाईने शिक्षण संस्थाचालकांमध्ये धावपळ उडाली आहे. काही महिन्यांपूर्वीच प्रत्येक तालुक्यात अशा प्रकारे शैक्षणिक प्रयोजनासाठी अल्पदरात देण्यात आलेल्या शासकीय जमिनींचा योग्य विनियोग केला जातो किंवा नाही याचा  अहवाल जिल्हा प्रशासनाने सर्वच तहसीलदारांकडून मागितला असता, त्यात ही बाब उघडकीस आली. शासकीय जमीन ज्या प्रयोजनासाठी शासनाकडून संबंधितांना दिली जाते, त्यांनी त्या जमिनीचा वापर तीन वर्षांच्या आत ज्या प्रयोजनासाठी जमीन घेतली त्यासाठी केला जावा अन्यथा तीन वर्षांत तसा उपयोग न केल्यास सदरची जमीन पुन्हा शासन जमा करण्याची तरतूद आहे. जर संबंधित या काळात त्या जमिनीचा वापर काही कारणास्तव तीन वर्षांत करू शकले नाहीत तर तसा अर्ज शासन दरबारी करून त्यास मुदतवाढ देण्याचीही तरतूद आहे. मात्र या तरतुदीचा वापर न करता शासनाकडून घेतलेल्या जमिनी आहे तशाच पडून असल्याने त्याचा आढावा घेतल्यावर लक्षात आले आहे. यातील काही शासकीय जमिनी थेट राज्य सरकारकडूनच संंबंधिताना अदा करण्यात आल्या आहेत तर काही जमिनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अदा करण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ संचालक असलेल्या मुंबई एज्युकेशन ट्रस्टचा समावेश आहे. नाशिक तालुक्यातील गोवर्धन शिवारात शैक्षणिक संस्थेसाठी तत्कालीन राज्य सरकारने शासकीय जमीन अदा केली होती.