शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

मान्सुनपुर्व सरींनी शहराला झोडपले; तीस मिनिटांत १९.४मिमीपर्यंत पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 20:05 IST

रविवारची सुटी आणि कोरोनाचे निर्बंध यामुळे शहरातील रस्त्यांवर तसा शुकशुकाटच होता. नोकरदारांचीही फारशी रेलचेल नव्हती. संध्याकाळी पाच वाजता दमदार सरींचा धुव्वाधार वर्षाव सुरु झाला. ढगांचा गडगडाट अन‌् वीजांचा कडकडाटाने शहरवासीय हादरले.

ठळक मुद्देउपनगरांमध्येही दमदार सलामीतापमानाचा पारा ३४ अंश तर आर्द्रता ९८ टक्केपुढील चार दिवस सरींची शक्यता

नाशिक : दोन दिवसांपासून वातावरणात वाढणारा उकाडा आणि कमाल तापमानाचा चढता पारा यामुळे नाशिककर घामाघुम झाले होते. रविवारच्या सुटीचा आपापल्या घरात आनंद लुटत असताना संध्याकाळी मान्सुनपुर्व सरींनी जोरदार हजेरी लावल्याने नाशिककरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. सुमारे अर्धा तास शहरासह उपनगरांमध्ये पाऊस झाला. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत १९.४मि.मी इतका पाऊस पडल्याची नोंद झाली.ढगांच्या गडगडाट अन‌् विजांच्या कडकडाटात पावसाच्या सरींनी रविवारी सलामी दिली. दुपारी चार वाजेपासून शहर व परिसरात ढगाळ हवामान तयार होण्यास सुरुवात झाली होती. सायंकाळी पाच वाजेपासून पावसाला सुरुवात झाली. शरणपूररोड, कॉलेजरोड, सिडको, सातपूरसह पंचवटी, नाशिकरोड, इंदिरानगर, गंगापूर रोड भागाला पावसाने झोडपले. रविवारची सुटी आणि कोरोनाचे निर्बंध यामुळे शहरातील रस्त्यांवर तसा शुकशुकाटच होता. नोकरदारांचीही फारशी रेलचेल नव्हती. संध्याकाळी पाच वाजता दमदार सरींचा धुव्वाधार वर्षाव सुरु झाला. ढगांचा गडगडाट अन‌् वीजांचा कडकडाटाने शहरवासीय हादरले. सुमारे अर्धा तास झालेल्या या पावसाने रस्त्यांवरुन पाण्याचे पाट वाहू लागले होते. उंचसखल भागात पावसाचे पाणी साचले होते. स्मार्टसिटीअंतर्गत शहर व परिसरात ठिकठिकाणी सुरु असलेल्या विकासकामांच्या ठिकाणी त्रेधातिरिपिट उडाल्याचे दिसून आली. कामगारांना हातातील काम सोडून आडोशाला जावे लागले.तापमानाचा पारा ३४ अंश तर आर्द्रता ९८ टक्केरात्री उशिरापर्यंत काही उपनगरांमध्ये तसेच शहराच्या मध्यवर्ती भागातसुध्दा हलक्या सरींचा वर्षाव सुरुच होता. तसेच ढगाळ हवामानही कायम होते. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याचा अनुभव नाशिककरांना आला असला तरी कमाल तापमानाचा पारा शहरात रविवारी ३४.४ अंशापर्यंत पोहचल्याची नोंद झाली. यासोबतच संध्याकाळी वातावरणात आर्द्रतेचेही प्रमाण वाढलेले दिसून आली. ९८ टक्के इतकी आर्द्रता मोजली गेली.--

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाRainपाऊसweatherहवामान