शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

प्रभात फेरीने केली विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 01:02 IST

दरवर्षी जागतिक एड्स दिन संपूर्ण देशात साजरा केला जातो. यानिमित्ताने सोमवारी (दि.२) जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रक विभाग, जिल्हा शासकीय रुग्णालयातर्फे नागरिक, महाविद्यालयीन युवकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

नाशिक : दरवर्षी जागतिक एड्स दिन संपूर्ण देशात साजरा केला जातो. यानिमित्ताने सोमवारी (दि.२) जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रक विभाग, जिल्हा शासकीय रुग्णालयातर्फे नागरिक, महाविद्यालयीन युवकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयीन युवकांनी पुढाकार घेऊन जनजागृती करण्याचे आवाहन केले. तर आरोग्य सेवेचे उपसंचालक डॉ. सुरेश जगदाळे यांनी या आजाराबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. रत्ना रावखंडे यांनी एड्सबद्दल असलेल्या गैरसमजुतीबाबत तसेच शासन स्तरावरील देण्यात येणाऱ्या सेवांची माहिती दिली. यावेळी कार्यक्रमात उपस्थित युवक व युवतींना एड्सविषयक शपथ देण्यात आली. त्यानंतर हिरवा झेंडा दाखवून प्रभातफेरीची सुरुवात करण्यात आली. ही प्रभात फेरी जिल्हा रुग्णालयापासून जिल्हा परिषद, कालिदास नाट्यगृह, जुने सीबीएस चौक मार्गे पुन्हा जिल्हा रुग्णालय येथे आली. या मार्गाने काढण्यात आली. या फेरीत ३३ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सकचे डॉ. विजय डेकाटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निखिल सैंदाणे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकचे डॉ. आनंद पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्पना कुटे आदी उपस्थित होते.

टॅग्स :HIV-AIDSएड्सStudentविद्यार्थीHealthआरोग्य