शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समितीवर मनसेचाच सभापती विराजमान होण्याची शक्यता

By admin | Updated: March 7, 2015 00:20 IST

स्थायी समितीवर मनसेचाच सभापती विराजमान होण्याची शक्यता

नाशिक : पुणे महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत मनसेने राष्ट्रवादी कॉँग्रेसला उघडपणे साथ दिल्याने नाशिकमध्ये स्थायी समितीवर पुन्हा एकदा मनसेचाच सभापती विराजमान होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पुण्याच्या मोबदल्यात नाशिक मनसेच्या ताब्यात देण्याचा निर्णय झाला असल्यास मनसेच्या या बेगमीमुळे सभापतिपदाच्या शर्यतीतून राष्ट्रवादी ‘उणे’ होण्याची चिन्हे दिसू लागली असून, स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि अपक्षांच्या मदतीने मनसेचा सभापती विराजमान होणे जवळपास निश्चित मानले जात आहे. नाशिकच्या स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीसाठी हालचाली गतिमान झाल्या असताना आणि राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार शिवाजी चुंबळे यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावत सभापतिपदासाठी दावा ठोकला असताना गुरुवारी झालेल्या पुणे महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाच्या झालेल्या निवडणुकीने समीकरणे बदलून टाकली आहेत. पुण्यात यापूर्वी राष्ट्रवादीची सेना-भाजपाबरोबर युती होती; परंतु स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत आश्चर्यकारकपणे सूत्रे फिरली आणि मनसेच्या साथीने राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम या सभापतिपदी आरूढ झाल्या. पुण्यात सभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी, कॉँग्रेस आणि मनसे अशी युती झाल्याने त्याचे पडसाद नाशिक महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत उमटणार आहेत. महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने ऐनवेळी मनसेला मदतीचा हात दिला होता. त्याच मदतीची आठवण करून देत आता स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने दावा ठोकला आहे. मागील आठवड्यात राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार शिवाजी चुंबळे आणि पक्षाच्या गटनेत्या कविता कर्डक यांनी ‘रामायण’ बंगल्यावर जाऊन महापौरांसह मनसेच्या शहराध्यक्षांशी गुफ्तगुही केले होते. परंतु रविवार दि. १ मार्चला नाशिक दौऱ्यावर आलेले मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कोणत्याही परिस्थितीत सभापतिपद मनसेकडेच कायम राखण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांना दिले होते. (प्रतिनिधी)