शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण तापले : मालेगाव बाजार समिती निवडणूक

By admin | Updated: January 22, 2016 22:38 IST

विरोधकांच्या एकत्र पॅनलच्या हालचाली

 मालेगाव- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक निवडीसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीचे राजकारण तापण्यास सुरुवात झाली असून, शहरातील कट्टर विरोधक एकत्र येऊन पॅनल तयार करण्याच्या हालचाली गतिमान झाल्याची चर्चा रंगली आहे.येथील बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक सुमारे आठ वर्षांनी न्यायालयाच्या आदेशाने घेण्यात येत आहे. यासाठी उच्च न्यायालयाने आदेश दिल्याने जिल्हा निबंधकांनी निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. यानुसार अर्ज दाखल करण्यात आले असून, या अर्जांची छाननी झाली आहे. हा निवडणूक कार्यक्रम सुरू असला तरी, बाहेर मात्र याचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.गेल्या निवडणुकीत विद्यमान सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने सत्ता काबीज केली होती. ती सत्ता कायम राखण्याची त्यांची इच्छा आहे. बाजार समितीतील सत्तेचा वापर तालुक्यातील राजकारणासाठी फायदेशीर आहे. गेल्या निवडणुकीचा वचपा काढण्यासाठी व तालुक्यातील राजकारणाला शह देण्यासाठी या निवडणुकीत एक पॅनल तयार करण्यात आले असून, त्यांनी कर्मवीर हिरे सेना असे नामकरण करण्यात आले आहे.या पॅनलला निवडणुकीत पराभूत करण्यासाठी सर्व विरोधक एकवटण्यास सुरुवात झाली आहे. इतरवेळी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले हे विरोधक राजकारणात कधी कायमस्वरूपी शत्रू नसतात तसेच विरोधकांचा विरोधी हा मित्र या भावनेने शहरात विरोधी पक्षांना एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. या विरोधी नेत्यांच्या तीन ते चार बैठका झाल्या असून, त्यात एकत्रित निवडणूक लढविण्याच्या मुद्द्यावर एकमत झाले असल्याचे बोलले जाते. या बैठकीत काही मुद्द्यांवर चर्चा केली जात असून, त्यात प्रत्येकाच्या वाट्याच्या संचालकांची आकडेवारी व काही मुद्दे यात अडथळा ठरत असल्याचे बोलले जाते. यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत. (वार्ताहर)