भंगार बाजार हटविल्याने राजकीय गणिते बदलणार

By Admin | Updated: January 9, 2017 01:30 IST2017-01-09T01:29:50+5:302017-01-09T01:30:05+5:30

सातपूर - अंबड : एक गठ्ठा मतांवर डोळा असलेल्यांना बसणार फटका

Political calculations will be changed due to deletion of scrap market | भंगार बाजार हटविल्याने राजकीय गणिते बदलणार

भंगार बाजार हटविल्याने राजकीय गणिते बदलणार

गोकुळ सोनवणे सातपूर
सातपूर - अंबड लिंकरोडवरील बहुचर्चित भंगार बाजार हटविण्यात येत असल्याने याचा परिणाम महापालिका निवडणुकीवर होणार आहे. भंगार बाजारातील एकगठ्ठा मतांवर डोळा ठेवून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना याचा फटका बसणार आहे. अशा उमेदवारांची राजकीय समीकरणे आता बदलणार असल्याने त्यांच्यामध्ये चलबिचल निर्माण झाली आहे.
महानगरपालिकेची पहिली निवडणूक (१९९२) सोडली, तर उर्वरित चार पंचवार्षिक निवडणुकीत या भंगार बाजाराच्या मुद्द्यावर राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी राजकारण केले आहे. प्रत्येक निवडणुकीत या भागातील उमेदवारांनी आपल्या जाहीरनाम्यात आणि वचननाम्यात भंगार बाजार हटविण्याचे आश्वासन दिले आहे. प्रत्यक्षात याच उमेदवारांकडून निवडणूक काळात या भंगार बाजारातील व्यावसायिकांचे एकगठ्ठा मतदान मिळविण्यासाठी घोडेबाजार करण्याचा प्रयत्न झाला आहे, तर काही उमेदवार केवळ भंगार व्यावसायिकांमुळेच निवडून आलेले आहेत. तर काही उमेदवारांना पाठिंबा मिळालेला आहे. निवडून गेल्यानंतर मात्र एकाही लोकप्रतिनिधीने या भंगार बाजाराच्या विरोधात टोकाची भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे गेल्या २० वर्षांपासून हा विषय प्रलंबित होता.

Web Title: Political calculations will be changed due to deletion of scrap market