शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाच्या निर्देशाकडे पोलिसांची डोळेझाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:16 IST

निसाका अपहार : उच्च न्यायालयात फेरयाचिकेची तयारी

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : निफाड सहकारी साखर कारखान्यात झालेल्या साखरविक्री अडीच कोटी रकमेच्या अपहारप्रकरणी न्यायालयाने चौकशी करण्याचे आदेश देऊनही निफाड पोलिसांनी अद्याप चौकशी न केल्याने यासंदर्भात न्यायालयात फेरयाचिका दाखल करण्याचा इशारा फोर्स व शेतकरी संघटनेने दिला आहे. निफाड सहकारी साखर कारखान्यात २००५ मध्ये झालेल्या दहा कोटीपेक्षा जास्त रुपयांच्या घोटाळ्यात साखर व्यापाऱ्याने वेळोवेळी १२९ धनादेश देऊन एक लाख ८५ हजार ६९४ क्विंटल साखर उचलली, मात्र व्यापाऱ्याने दिलेले धनादेश खात्यावर पैसे नसल्याच्या कारणाने परत येत होते. अशा परिस्थितीत कारखान्याने काही धनादेश वटण्यासाठी बॅँकेत टाकलेच नाहीत. यासंदर्भात साखर आयुक्तांकडे तक्रार करण्यात आल्यावर त्यांनी संबंधित कामगार व संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला, परंतु पोलिसांनी टाळाटाळ केल्याने अखेर शेतकरी संघटना व फोर्स संघटनेने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्याने त्याच्या आधारे ४ जुलै २००७ रोजी ९४ बोगस धनादेशची रक्कम दहा कोटी ५८ लाख ९ हजार रकमेच्या अपहाराबाबत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. या नंतर जिल्हा बॅँकेने साखरेच्या साठ्यावर मालतारण कर्ज दिले असल्याने करण्यात आलेल्या लेखा परीक्षणात व्यापाऱ्याने दिलेल्या १२९ पैकी ३५ धनादेश वटलेले नसल्याचे लक्षात आले. संघटनेने उच्च न्यायालयाच्या निदर्शनास सदरची बाब आणून दिली. न्यायमूर्ती अनिल दवे व धर्माधिकारी यांनी यासंदर्भात ११ मार्च २०१० रोजी पोलिसांना पुढील तपासाचे आदेश देत याचिका निकाली काढली. मात्र सात वर्षे उलटूनही पोलिसांनी याबाबत काहीच कार्यवाही केली नाही, परिणामी कारखान्याच्या दोन कोटी ४६ लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी पुन्हा न्यायालयात जाण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अर्जुनतात्या बोराडे, शंकर पुरकर, विष्णू ताकाटे, भाऊसाहेब गडाख, के. डी. मोरे, अ‍ॅड. नानासाहेब जाधव यांनी दिला आहे.