शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटीत पोलिसांचा हवेत गोळीबार

By admin | Updated: February 24, 2017 01:52 IST

मतमोजणीनंतर पडसाद : मतदानप्रक्रियेवर आक्षेप; दगडफेक आणि लाठीमार; सहा पोलीस कर्मचारी जखमी

 नाशिक : महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर होवून भाजपाने बहुमताकडे वाटचाल सुरू केली असतानाच, आमदार बाळासाहेब सानप यांचा पुत्र उमेदवारी करीत असलेल्या पंचवटीतील प्रभाग क्रमांक तीनमध्ये झालेल्या मतदानापेक्षा अधिक मतमोजणी झाल्याच्या संशयावरून तणाव निर्माण झाला. परिणामी जमाव संतप्त होत मतमोजणी केंद्रावर चालून येत तुफान दगडफेक करीत असल्याचे पाहून पोलिसांनी अगोदर लाठीमार व नंतर हवेत गोळीबार केल्याने तणावात आणखी भर पडली. रात्री ८ वाजेच्या दरम्यान पंचवटीतील स्व. मीनाताई ठाकरे स्टेडियममधील मतमोजणी केंद्रात घडला. प्रभाग क्रमांक तीनमधील मतमोजणी सुरू असताना भाजपाचे चारही उमेदवार पहिल्या व दुसऱ्या फेरीत पुढे असल्याचे पाहून सेनेचे उमेदवार मोगरे यांच्या मतदान प्रतिनिधींनी मतमोजणीला आक्षेप घेतला व मतदान कमी झाले असताना त्यात वाढ कशी झाली याचा जाब अगोदर मतमोजणी कर्मचाऱ्यांना विचारून मतमोजणी बंद पाडली. भाजपाने मतदान यंत्रात घोळ केल्याची अफवा झपाट्याने पसरल्यामुळे या ठिकाणी हजारोंचा जमाव जमला, तर त्याचवेळी भाजपाचे कार्यकर्तेही समोरासमोर आल्यामुळे तणाव निर्माण होऊन त्यांनी एकमेकांवर चाल केली. जमावाने थेट मतमोजणी केंद्रावर दगडफेक सुरू केली, त्यामुळे मतमोजणी केंद्रांचे दरवाजे बंद करून घेण्यात आल्यावर बाहेर उभ्या असलेल्या वाहनांना लक्ष्य करण्यात येऊन त्यांची नासधूस केली. पोलिसांनी जमावाला काबूत आणण्यासाठी प्रारंभी लाठीमार केला, परंतु जमाव पांगण्याऐवजी आणखी चवताळल्याने त्यांनी पोलिसांवरही दगडफेक सुरू केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून अखेर पोलिसांनी हवेत चार राउंड फायर केले. दरम्यान, या घटनेचे वृत्त कळताच पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला तसेच आमदार बाळासाहेब सानप यांनीही घटनास्थळी भेट दिली.

दगडफेक अन पोलिसांवर चाल

हिरावाडी परिसरातील मीनाताई ठाकरे स्टेडियममध्ये मतमोजणी सुरू होती. यावेळी प्रभाग तीनच्या मतमोजणीमध्ये गोंधळ झाल्याचा आरोप शिवसेना व अन्य काही पक्षांच्या उमेदवारांनी केला. चारही जागांवर भाजपाच्या उमेदवारांना आघाडी मिळाल्याने मतमोजणीमध्ये फेरफार झाल्याच्या संशयावरु न अन्य राजकीय पक्षांचे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने एकत्र आले. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. यावेळी जमावाने पोलिसांच्या दिशेने मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यास सुरूवात केली.

भाजप-सेनामध्ये भिडत

प्रभाग तीनमध्ये भाजपाच्या उमेदवारांनी आघाडी घेतल्याने शिवसेना-भाजपाचे कार्यकर्ते आपापसांत भिडले. उमेदवार आमनेसामने आले. अन्य उमेदवारांच्या कार्यकर्त्यांसह भाजपाचे कार्यकर्ते आपापसांत भिडले. आमदार बाळासाहेब सानप हे भाजपाचे शहराध्यक्ष असून, त्यांचा हा मतदारसंघ असलेला परिसर आहे. क्युआरटीचा जवान जखमीहिंसक जमावावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार सुरू केला. यावेळी जमावामधून पोलिसांच्या दिशेने दगडफेक करण्यात आल्यामुळे जलद कृती दलाचा (क्युआरटी) जवान जखमी झाला आहे. पोलिसांनी त्याला उपचारार्थ झाकीर हुसेन रुग्णालयात दाखल केले आहे.