मालुंजे सामूहिक बलात्कारातील संशयितांना पोलीस कोठडी

By Admin | Updated: February 9, 2015 01:13 IST2015-02-09T01:12:49+5:302015-02-09T01:13:03+5:30

मालुंजे सामूहिक बलात्कारातील संशयितांना पोलीस कोठडी

Police cell to maulenge gang rape suspects | मालुंजे सामूहिक बलात्कारातील संशयितांना पोलीस कोठडी

मालुंजे सामूहिक बलात्कारातील संशयितांना पोलीस कोठडी

  नाशिक : इगतपुरी तालुक्यातील मालुंजे येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोघा संशयितांची न्यायालयाने तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत, तर तिघा अल्पवयीन मुलांची रिमांड होममध्ये रवानगी करण्याचे आदेश दिले आहेत़ या प्रकरणी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात गुन्हा दाखल आहे़ इगतपुरी तालुक्यातील मालुंजे येथील एका अल्पवयीन मुलीस संशयित राहुल कैलास गवळे, संदीप लहू गवळे व त्यांच्या तीन सहकाऱ्यांनी दुकानातून वस्तू आणण्यास पाठविले़ ही मुलगी आपल्या लहान बहिणीसोबत दुकानात जात असताना अंधाराचा फायदा घेऊन निर्जनस्थळी नेले व सामूहिक बलात्कार केला़ यानंतर कशीबशी सुटका करून घरी आल्यानंतर या मुलीने हा प्रकार घरी सांगितल्यानंतर वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली़ या सामूहिक बलात्कार प्रकरणातील संशयित राहुल गवळे, संदीप गवळे व उर्वरित तिघा अल्पवयीन मुलांनी पोलिसांनी अटक केली असून, रविवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले़ यातील दोघांना ११ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, उर्वरित तिघांची रिमांड होममध्ये रवानगी करण्यात आली आहे़ सरकार पक्षातर्फे अ‍ॅड़ पंकज चंद्रकोर यांनी काम पाहिले़ (प्रतिनिधी)

Web Title: Police cell to maulenge gang rape suspects