प्रेयसीचा खून करून पळालेला पोलीसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 15:06 IST2019-12-04T15:06:21+5:302019-12-04T15:06:54+5:30

सिन्नर : येथील संजीवनीनगरमध्ये प्रेयसीचा गळा आवळून खून करून फरारी झालेल्या परप्रांतीय संशयिताला सिन्नर पोलिसांनी तब्बल दोन महिन्यांनी ताब्यात घेतले.

 Police arrested the boyfriend and fled | प्रेयसीचा खून करून पळालेला पोलीसांच्या ताब्यात

प्रेयसीचा खून करून पळालेला पोलीसांच्या ताब्यात

सिन्नर : येथील संजीवनीनगरमध्ये प्रेयसीचा गळा आवळून खून करून फरारी झालेल्या परप्रांतीय संशयिताला सिन्नर पोलिसांनी तब्बल दोन महिन्यांनी ताब्यात घेतले. दर्वेश गेंदालाल चौरे (वय ३०), रा. चौला मंदिर, भोपाळ असे संशयिताचे नाव आहे. सिन्नर पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता, पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सरदवाडी रोड परिसरातील संजीवनीनगर मधील गिरीश शिरसाठ यांच्या घरात परप्रांतीय दर्वेश चौरे, त्याची प्रेयसी रेखा व तिची नऊ वर्षांची मुलगी रिया यांच्यासह भाडेकरू म्हणून राहत होता. २० सप्टेंबर २०१९ ला दर्वेश चौरे याने मुलगी घरात नसताना प्रेयसी रेखाचा ओढणीने गळा आवळून खून केला व घराला कुलूप लावून पोबारा केला. याबाबत सिन्नर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला.दरम्यान, रेखाचा खून करून दर्वेश चौरे याने मध्य प्रदेशतील त्याच्या मूळ गावी आसरा घेतला होता. मध्यप्रदेशातील हर्दा जिल्ह्यात एका गुन्ह्यात स्थानिक पोलिसांनी अटक करून त्याला मध्यवर्ती कारागृहात पाठविले होते. तेथेच दर्वेशने गुन्ह्याची कबुली दिली. दर्वेशबाबत सिन्नर पोलिसांना माहिती मिळताच मध्य प्रदेश पोलिसांशी संपर्क करून त्याला ताब्यात देण्याची मागणी केली होती. सहाय्यक पोलिस निरीक्षक आर. बी. रसेडे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गणेश परदेशी, नवनाथ चकोर, पी. सी. गोडे, प्रवीण गुंजाळ यांनी संशियताला सिन्नरला आणले.

Web Title:  Police arrested the boyfriend and fled

टॅग्स :Nashikनाशिक