शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

पिळकोस-कळवण रस्ता बनला मृत्यूचा सापळा

By admin | Updated: September 6, 2016 22:09 IST

राज्य महामार्ग क्रमांक १७ : बांधकाम विभागाचे दुर्लक्ष; प्रवाशांत संताप

 संतोष वाघ पिळकोसवेळ : दुपारी १२ वाजेची.स्थळ : पिळकोस ते कळवण रस्तासटाणा-कळवण-मांगबारी-पिळकोस -कळवण या राज्य महामार्ग क्रमांक १७ची पिळकोस ते कळवण या दहा किमी अंतराच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. दोन महिन्यांपासून हा रस्ता एका बाजूला खचला जात असल्याने अपघात होण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. या मार्गावर आजवर पाच ते सहा वाहनचालकांना जीवही गमवावा लागला आहे. पिळकोस ते कळवण या दहा किमी अंतरावरील प्रवास जीवघेणा ठरू लागल्याने परिसरातील ग्रामस्थ, शाळकरी मुले, शेतकरीबांधव व व्यवसाय/ नोकरीनिमित्त दररोज ये-जा करणारा नोकरदारवर्ग व चाकरमानी यांच्याकडून सार्वजनिक बांधकाम विभागावर प्रचंड संताप होत आहे. या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करून रस्ता सुरळीत करावा, अशी मागणी पिळकोस, जुनी बेज, नवी बेज, भादवण व बगडू गावातील ग्रामस्थांनी केली आहे. अनेक दिवसाच्या मागणीकडे संबंधित बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्यामुळे कळवण बाजार समितीचे संचालक शीतलकुमार अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पिळकोस, जुनी बेज, नवी बेज, भादवण, बगडू या गावांतील ग्रामस्थांचे शिष्टमंडळ राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री व मुख्यमंत्री यांची भेट घेऊन याविषयी आपली कैफियत मांडणार असल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले आहे. सटाणा-पिळकोस मार्गे कळवण या महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून रस्त्याची पूर्णत: चाळण झाली आहह. पिळकोस ते कळवण हा दहा किमीचा रस्ता डाव्या बाजूचा एक ते दीड फूटखचला गेल्याने या ठिकाणाहून प्रवास करताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. खड्डे वाचवण्याच्या नादात अनेकवेळा लहान-मोठे अपघातही झाले आहेत यात आतापर्यंत पाच ते सहा वाहनचालकांना जीव गमवावा लागला आहे.हा राज्य महामार्ग ज्या वेळेस तयार झाला त्यावेळेस पिळकोस ते कळवण दरम्यान अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम झाले असल्याचे बोलले जात आहे. तालुक्यातील काही लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी आपल्या स्वार्थासाठी मर्जीतील ठेकेदाराकडून सदर रस्त्याचे काम करून घेतले आहे. त्यामुळे रस्त्याची पूर्णत: दुर्दशा झाल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. पिळकोस-कळवण रस्त्याच्या दुर्दशेला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी जबाबदार असून, रस्त्याच्या कामाची विभागीय चौकशी होऊन दोषींवर दंडात्मक व कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी शीतलकुमार अहिरे, शांताराम जाधव, अशोक पवार, साहेबराव जाधव, कैलास पाटील, नीलेश जाधव, राहुल सूर्यवंशी, बाळासाहेब अहेर, उत्तम मोरे, मंगेश आहेर, राहुल आहेर, केवळ वाघ, मुरलीधर वाघ, निवृत्ती जाधव, दादाजी जाधव, सचिन वाघ, बुधा जाधव, हंसराज वाघ आदिंसह परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.