शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यात सरळ लढतीचे चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 01:40 IST

विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी बागलाण विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

सटाणा : विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी बागलाण विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे.बागलाणमधून निवडणूक रिंगणात सहा उमेदवार उतरले असले तरी भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार दिलीप मंगळू बोरसे व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवार दीपिका चव्हाण यांच्यातच खरी लढत रंगणार आहे. निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्याने उद्यापासून प्रचाराचा धुरळा उडणार आहे.गेल्या निवडणुकीत बागलाणमधून तब्बल अकरा उमेदवार रिंगणात उतरले होते. या निवडणुकीत १५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आज अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी तब्बल नऊ जणांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले. या निवडणुकीत माजी आमदार दिलीप बोरसे, जिल्हा परिषद सदस्य साधना गवळी हे भाजपचे प्रबळ दावेदार मानले जात होते. उमेदवार तयार झाले होते. मात्र अखेरच्या क्षणी दिलीप बोरसे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. त्यामुळे सर्वच चर्चांना पूर्णविराम मिळाला. दुसरीकडे आमदार दीपिका चव्हाण यांनीदेखील पक्षांतराचा प्रयत्न करून पाहिला. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी पक्षातच राहणार असल्याचे जाहीर करून त्यावर पडदा टाकला.दरम्यान, आज अर्ज माघारीच्या दिवशी अखेरच्या दिवशी पंधरा पैकी नऊ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे वरवर षष्ठरंगी लढत दिसत असली तरी खरी लढत भाजप-सेना महायुती आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस यांच्यातच होणार असल्याचे चित्र आहे.उर्वरित चार उमेदवारांमध्ये अपक्ष उमेदवार राकेश घोडे हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे आहेत. तर बसपाच्या उमेदवार अंजना मोरे यांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादीला फटका बसण्याची शक्यता आहे.रिंगणातील उमेदवार...दिलीप बोरसे (भाजप), दीपिका चव्हाण (राष्ट्रवादी), अंजना मोरे (बसपा), गुलाब गावित (अपक्ष), राकेश घोडे (अपक्ष), पंडित बोरसे (अपक्ष)२०१४ मध्ये होते ११ उमेदवार ।यंदा आहेत एकूण ६ उमेदवार

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019baglan-acबागलाणBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस